आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MAGGI पाठोपाठ आता NESTLE च्या मिल्क पावडरमध्ये आढळल्या अळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोईम्बतूर - मॅगी नूडल्समध्ये आरोग्याला घातक अशी तत्वे आढळल्यानंतर आता याच कंपनीच्या म्हणजे नेस्ले कंपनीच्या आणखी एका प्रोडक्ट मिल्क पावडरमध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार कोईम्बतूरच्या फूड अॅनालिसिस लॅबच्या रिपोर्टमध्ये कंपनीच्या मिल्क पावडरच्या सँपलमध्ये 28 जिवंत अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. तसेच 22 सिटोफिलस ओरिजे (तांदळातील सोनकिडे) आढळले आहेत. तमिळनाडूच्या फूड सेफ्टी विंगने कंपनीच्या मिल्क पावडरला अनसेफ घोषित केले आहे. तसेच फूड सेफ्टी ऑफिसर आर कठिरवन ने रिपोर्टला दुजोरा दिला आहे. मात्र, याआधारावर नेस्लेचे सर्व प्रोडक्ट्स सदोष असल्याचे घोषित करता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

असे आले समोर
कोइम्बतूरच्या पुलियाकुलममध्ये राहणारा टॅक्सी ड्रायव्हर के. प्रेम अनंतने मुलांसाठी नेस्लेचे NAN PRO 3 मिल्क पावडरचे 380 ग्रॅमचे पाकिट खरेदी केले होते. त्यांनी यापूर्वीही त्यांच्या मुलांना हे प्रोडक्ट दिले होते. ते जेव्हा दुसरे पाकिट फोडत होते, त्यावेळी त्यांना त्यात अळ्या सापडल्या. दोन दिवसांनी ज्या मुलाला हे पावडर देण्यात आले होते त्याला, स्किन अॅलर्जी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अनंतने नेस्लेच्या कस्टमर केयरकडे त्याची तक्रार केली.
कंपनीने लोकल एरिया मॅनेजरला चौकशीसाठी पाठवले. त्यावेळी मॅनेजरने त्याबदल्यात दुसरे पाकिट देण्याची ऑफर दिली. पण अनंत यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर ते 29 एप्रिलला तामिळनाडूच्या फूड सेफ्टी अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या कोइम्बतूर शाखेत गेले. त्यांनी तेथे तपासणीसाठी सँपल दिले.