आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीन टीचे रोपटे लावून डासांना पळवून लावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - डासांपासून मुक्तीचा दावा करणारी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, परंतु नैसर्गिक आणि स्वस्त असा उपाय काशी हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी शोधून काढला आहे. ग्रीन टीच्या रोपट्यावर झालेल्या संशोधनानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख के.एन. द्विवेदी यांनी ही माहिती दिली. रोपट्याच्या विशिष्ट वासामुळे डास परिसरात येत नाहीत, असे या अभ्यासातून दिसून आले. ग्रामीण भागात अशा प्रकारचा चहा सहजपणे आढळून येतो. ग्रीन टीचा वास हा लिंबाप्रमाणे असतो. त्याची उपलब्धता आणि स्वस्त असल्याने इतर डास मारणा-या उत्पादनांच्या तुलनेने हे रोपटे उपयोगी ठरते. डास या झाडांच्या जवळ येत नाहीत. त्याचा फायदा मानवी आरोग्यासाठी आहे. आयुर्वेदिक भाषेत त्याला कृत्रण असे संबोधले जाते. शास्त्रीय भाषेत त्याला सिंबॉपॉगन स्कलथॅश, असे म्हटले जाते.