आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : मोदी जम्मू दौऱ्यावर, 70 हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दिवसाच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी जम्मूला पोहोचले. जम्मू विद्यापीठाच्या ऑडिटोरियममध्ये राज्याचे माजी अर्थमंत्री गिरधारीलाल डोगरा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते सहभागी झाले आहेत. मोदी या दौऱ्यादरम्यान जम्मू-काश्मीरसाठी 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधानांबरोबरच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचीही उपस्थिती आहे. डोगरा यांचा सगळेच फार आदर करायचे, त्यामुळेच कधीही निवडणूक हारले नाहीत, असे जेटली यावेळी बोलताना म्हणाले.

मोठ्या घोषणांची शक्यता
पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान जम्मू-काश्मीरसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात एम्स आणि आयआयटीच्या स्थापनेबाबतही घोषणा केली जाऊ शकतो. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी, पूरग्रस्तांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी ईदचे औचित्य साधून पॅकेजची घोषणा करू शकतात.
13 महिन्यांत 9 वेळा काश्मिर दौरा
- 4 जुलै : पंतप्रधान बनल्यानंतर प्रथमच दौरा. जम्मू, कटरा, श्रीनगर आणि उडी सेक्टर.
- 12 अगस्त : लेह आणि जम्मू काश्मीरला गेले.
- 7 सप्टेंबर : पूरग्रस्तांना भेटण्यासाठी दौरा.
- 23 ऑक्टोबर : आर्मीबरोबर आणि श्रीनगरमध्ये पूरग्रस्तांबरोबर दिवाळी साजरी केली.
- त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी पाच सभा घेतल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा कार्यक्रमाचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...