आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Report Of Most Famous Dasara Festivel Places

यंदा म्हैसूर येथे दसरा भव्यतेऐवजी मानवतेला असेल समर्पित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूरचा दसरा सुमारे ४०० वर्षांपासून साजरा होतो. २००८ मध्ये त्याला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून आयोजनाचा सर्व खर्च सरकार करते. - Divya Marathi
म्हैसूरचा दसरा सुमारे ४०० वर्षांपासून साजरा होतो. २००८ मध्ये त्याला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून आयोजनाचा सर्व खर्च सरकार करते.
म्हैसूर, कुलू आणि बस्तर. तिन्ही शहरे जगप्रसिद्ध दसऱ्यासाठी परिचित आहेत. देशातीलच नव्हे, तर जगभरातील लोक येथे उत्सव पाहण्यास येतात. तिघांचीही स्वतंत्र वैशिष्ट्ये. म्हैसूरचा दसरा भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. कुलूत तो देवतांच्या मिलनाचा प्रतीक आहे, तर बस्तरमध्ये ७५ दिवसांचा देवी महोत्सव अशी ओळख आहे. या तिन्ही ठिकाणी मुख्य आयोजनात रावणदहन होत नाही. विजयादशमीनिमित्त चला आपण घेऊया, देशाची गौरवपूर्ण ओळख ठरलेल्या या तीन शहरांतील उत्सवाची माहिती...
म्हैसूर येथून धर्मेंद्रसिंह भदौरिया

म्हैसूर : यंदा दसरा भव्यतेऐवजी मानवतेला असेल समर्पित
म्हैसूरबसस्थानकावरउतरलो तर जेथे दसरा साजरा करण्यासाठी जगभरातील लोक येतात त्या शहरात आलो असे वाटलेच नाही. या वेळी उत्साह दिसला नाही, फारशी वर्दळही नव्हती. या वेळी पूर्वीसारखी भव्यता का नाही, असे ट्रॅव्हल एजंट अनंथाला विचारले तेव्हा त्याने मोडक्यातोडक्या हिंदीत सांगितले- दसरा साध्या पद्धतीने साजरा होईल, असे सरकारने ठरवले आहे.त्यापेक्षा तो जास्त सांगू शकला नाही. नंतर डॉ. सी. जी. बेत्सुरमठ यांना भेटलो. ते म्हैसूर महापालिकेचे आयुक्त आणि दसरा आयोजन समितीचे सदस्य आहेत. ते म्हणाले, गेल्या महिन्यांत राज्यात ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यातील तीनचतुर्थांश तहसीलमध्ये दुष्काळ आहे. त्यामुळे दसरा साध्या पद्धतीने साजरा होत आहे. या वेळी परंपरा बाजूला सारत उत्सवाचे उद‌्घाटन शेतकऱ्याच्या हस्ते करण्यात आले.१० दिवसांच्या दसरा उत्सवानिमित्त ऐतिहासिक शहरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे३ २०१ ऐतिहासिक वास्तू व्यावसायिक संस्था परिसरात रोषणाई पाने फुलांची सजावट करण्यात आली आहे. यातही म्हैसूरच्या राजवाड्याची शान काही औरच आहे. खास आकर्षण असलेली जंबो सवारी आहे. पाहण्यासाठी सहा लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. म्हणजे तासाला २५०० पर्यटक. म्हैसूरच्या दसरा महोत्सवाला यंदा ४०५ वर्षे पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये राज्य सरकारने त्याला राज्योत्सवाचा दर्जा (नाद हब्बा) दिला होता. जंबोसवारीसाठी दररोज दोनवेळा १२ हत्ती पाच किलोमीटरच्या पथावर अभ्यास करत आहेत. यात प्रमुख आघाडीवर आहे अर्जून हत्ती. तो आपल्या पाठीवर ७५० किलो सोन्याच्या विशेष हौद्यात चामुंडेश्वरी देवीची प्रतिमा ठेवलेली असते. राजेशाही कुटुंबातील वारस म्हणून नुकतीच घोषणा झालेले यदुवीर कृष्णदत्ता चामराजा वाडियार देवीची प्रतिमा हौद्यात ठेवतील. त्यामुळे यंदाचा दसरा लोकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.
पुढे वाचा.. कुलू : येथे आमंत्रित देवतांनाही सरकारकडून मिळतो टीए-डीए