आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणातील सोनिपतमध्ये 35 वर्षीय व्यक्तीची फेसबुकवर ‘लाइव्ह’ आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीने स्वत: गळफास घेत असतानाचे चित्रीकरण फेसबुक लाइव्हवरून प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपक असे मृताचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवरून पोस्टही टाकली अाहे. ‘शेजारी राहणारी महिला पोलिस आणि तिच्या इन्स्पेक्टर प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत,’ असे दीपकने पोस्टमध्ये लिहिले आहे.
 
दीपक यांच्या शेजारी एक पोलिस पती-पत्नी राहतात. मात्र, त्यातील महिलेचे चंदिगडमधील एका पोलिस इन्स्पेक्टरशी अनैतिक संबंध असल्याचे दीपकला कळाले होते. त्याने या प्रकरणाची माहिती महिलेच्या पतीला दिली. पतीला अनैतिक संबंधाची माहिती दिल्याच्या कारणावरून संबंधित महिला आणि तिचा प्रियकर दोघेही दीपकला धमक्या देत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत, असे दीपकने पोस्टमध्ये लिहिले आहे.
 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची आपण ६० पानी डायरीही लिहिली आहे. पण ती पोलिसांना देण्याची कधी हिंमतच झाली नाही, असेही त्याने म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी दीपकने बहिणीला फोन करून वडिलांची काळजी घेण्यास सांगितले आणि नंतर फोन बंद करून टाकला. सायंकाळच्या वेळी फोनवरूनच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आत्महत्या पोस्ट केली. दीपकची पत्नी आणि मुलगा घटनेवेळी मथुरेला नातेवाइकांकडे गेले होते. त्यामुळे घरी कुणीच नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला अाहे. मात्र, संशयित आरोपी फरार आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, ‘इन्स्टाग्राम’वर लाइव्ह असताना १३ वर्षीय मुलाने स्वत:वरच झाडली गोळी
बातम्या आणखी आहेत...