आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश काँग्रेसच्या मांडीवर बसले, मुलायम यांच्यावरील हल्ल्याचाही त्यांना विसर पडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नौज - पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कन्नौजमध्ये होते. ते म्हणाले, '2014 मध्येही येथून असेच प्रेम मिळाले असते तर बरे झाले असते. मात्र तुम्ही नजरेला नजर कशी भीडवणार या भीतीने आम्हाला ही संधी दिली नाही.' काँग्रेस - सपा आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, 'विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांना विजयी होता आले नाही.' मोदी म्हणाले, 'अखिलेश काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांना मुलायमसिंहावर झालेला हल्लाही आता आठवत नसणार.'
 
मोदी म्हणाले, 'आज तुमचे जेवढे प्रेम आणि आशीर्वाद मला मिळत आहे ते 2014 मध्ये मिळाले असते तर किती चांगले झाले असते. उत्तर प्रदेशात काही जागांवर दोन परिवारातील लोक निवडणुका लढवत होते. तुम्ही लाजेखातर त्यांच्यावर कृपा केली. आता ते पुन्हा एकत्र येऊन तुमच्या स्वप्नांची राखरांगोळी करण्यासाठी आले आहे.'
 
कन्नौजबद्दल मोदी म्हणाले, ही धरती इत्रची धरती आहे. संपूर्ण देशात या धरतीचा सुगंध दरवळतो. आज मी तुमच्यासोबत सव्वाशे कोटी देशवासियांचा आनंद शेअर करणार आहे. भारताने आज अंतराळात विक्रम प्रस्थापित केला आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात सोडले. त्यातील फक्त तीन भारताचे आहेत तर 101 विविध देशांचे आहेत. भारताने अवकाशातही शतक झळकावले आहे. 
 
सपाच्या सूनबाईंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले का?
- मोदी म्हणाले, कन्नौज ज्या प्रमाणे इत्रसाठी ओळखले जाते तसेच येथील बटाटाही प्रसिद्ध आहे. मागील निवडणुकीत समाजवादीपक्षाच्या सूनबाईंनी बटाट्यावरील प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. बटाट्याचे चिप्स बनतील, बाजारात विक्री होईल. लोकांच्या पोटात जातील. आणि शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येईल, असे सांगत मोदींनी सवाल केला, आले का खिशात पैसे? उत्तर प्रदेश भाजपचा उल्लेख करुन मोदी म्हणाले, मी त्यांना धन्यवाद देतो त्यांनी शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव देण्याचे घोषणापत्रात म्हटले आहे. 
 
कन्नौज हा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय म्हणाले मोदी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...