आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Result LIVE: युपीतील जनतेचे मोदींनी मानले आभार, शहा म्हणाले-स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील बहुतांश निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून तीन चतुर्थांश जागा मिळाल्या आहेत. तर उत्तराखंडमध्येही स्पष्ट बहुमत मिळवले आहे. गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपने घेतलेली आघाडी पाहता याठिकाणीही भाजपला सत्ता स्थापण्यात यश मिळेल अशी चिन्हे आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे विजयासाठी जनतेचे आभार मानले आहे. 
 
दरम्यान, बसपच्या प्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममध्ये घोळ करून भाजपने विजय मिळवल्या असल्याचा आरोप केला आहे. तर हा विजय स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा विजय असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले. 

हेही वाचा.... पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग बनले 'किंग', पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा, अदलीदलाला 'आप'ने पछाडले
 
ट्वीटद्वारे मोदींनी मानले जनतेचे आभार 
- अथक परिश्रम घेणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार. लोकांचा विश्वास जिंकण्याचे महत्त्वाचे काम कार्यकर्त्यांनी केले.  
- भाजपचा हा विजय सुशासन आणि विकासाचा विजय आहे. 
- काशीचा खासदार म्हणून मला जनतेचे अपार प्रेम मिळाले. काशीच्या या जनतेला माझे शतश: नमन. 
- उत्तराखंडचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी देवभूमीतील लोकांचे आभार.
- भाजप तत्परतेने आणि कर्मठपणे जनतेची सेवा करेल असे मी वचन देतो. 
 
अमित शहांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार
- उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तीन चतुर्थांश बहुमत मिळाले आहे. हा स्वातंत्र्यानंतरचा आतापर्यंतचा मोठा विजय आहे.
- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरच्या जनेतेचे आणि भाजपच्या
कार्यकर्त्यांचे अभिनंदन. 
- मणिपूरमध्येही भाजपला सत्ता स्थापन करता येईल एवढ्या जागा मिळाल्या आहेत. 
- नरेंद्र मोदींच्या परिश्रमाचा विजय.
- मोदी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.
- अमेठी आणि रायबरेलीतील 10 पैका 6 जागांवर बाजप विजय मिळवणार आहे. 
- मायावतींची मनस्थिती मी समजू शकतो. ईव्हीएमच्या त्यांच्या आरोपाबाबत मला काही बोलायचे नाही.
- पंतप्रधान मोदींचे पक्षाच्या वतीने रविवारी स्वागत करणार.
 
काय म्हणाल्या मायावती..
- कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपला जाणार अशी चर्चा संपूर्ण निवडणुकीत होती, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
- 2014 च्या निवडणुकांमध्येही ईव्हीएममध्ये घोळ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. 
- भाजपने एकही मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवेला नसतानाही मुस्लीमबहुल भागांतही त्यांना मते मिळाली हे शक्य नाही. 
- ईव्हीएम मॅनेज करण्यात आले. त्याशिवाय एवढा मोठा विजय मिळवणे शक्य नव्हते. 
- मुस्लीम बहुल भागांमध्येही भाजपला जास्त मते मिळाली.
 
 
LIVE UPDATES
- उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अभिनंदन- राहुल गांधी
- 5 वर्षांत उत्तर प्रदेशला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला- अखिलेश यादव
- बुलेट ट्रेनसाठी जनतेने भाजपला मतदान केले आहे. - अखिलेश यादव
- काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवू- अखिलेश यादव
- जनतेचा कौल आम्हाला मान्य, पराभवानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
- राजकारण्यांनी कोणालाही गृहित धरू नये हे जनतेने दाखवून दिले - स्मृती ईराणी 
- अनेक वर्षांनी उत्तर प्रदेशात हिंदुत्त्ववादी पक्षाला बहुमत मिळाले, आता तरी रामाचा वनवास संपणार का? - संजय राऊत
- नोटबंदीला विरोध करणाऱ्यांना युपीतील जनतेने धडा शिकवला - देवेंद्र फडणवीस 
- भ्रष्टाचारमुक्त आणि सुशासन असलेल्या कारभाराला जनतेचा पाठिंबा- देवेंद्र फडणवीस
- कोअर कमिटीच्या मिटींगमध्ये पराभवावर चर्चा करणार-प्रकाशसिंह बादल
- हा मोदींच्या नेतृत्त्वाचा आणि अमित शहांच्या परिश्रमाचा विजय. या निकालाने धर्म, जात, संप्रदाय अशी सर्व बंधने मोडीत काढली. 
- अमित शहांनी ट्वीट करून दिल्या शुभेच्छा.
- हा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचार विरहीत कारभार आणि जन कल्याणकारी योजनांचा विजय - अमित शहा
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत दोन्ही ठिकाणाहून पराभूत
- उत्तर प्रदेश बदलण्यासाठीचा विजय, भ्रष्टाचार, गुन्हेगारीच्या विरोधात केलेले मतदान - रवीशंकर प्रसाद
- योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधूल 9 पैकी 9 जागा भाजपाकडे. 
- भाजपच्या लखनऊ कार्यालयात धुळवड सुरू.
- मोदी आणि अमित शहा यांच्यामुळेच मिळवला विजय.
- पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमताचा आकडा.
- उत्तर प्रदेशात दलितबहुल भागांमध्येही साठ टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी भाजपची सरशी. 
- उत्तर प्रदेशात मुस्लीम आणि काँग्रेस बहुल भागात भाजपला लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा. 
- केंद्रात गेल्यानंतर पर्रिकरांनी पार्सेकरांकडे सोपवले होते नेतृत्त्व
- पर्रिकरांचे नीकटवर्तीय होते पार्सेकर
-  गोव्यात मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांचा पराभव
- उत्तर प्रदेशातील सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. 
- उत्तर प्रदेशात शिवपाल यादव पिछाडीवर
- उत्तराखंड मध्ये सुरुवातीच्या तासाभरानंतरच कल पाहता भाजपला बहुमताचा आकडा मिळाला आहे. 
- पंजाबमध्ये काँग्रेसची जोरदार आघाडी, आपला दुसरा क्रमांक सुरुवातीचे कल सत्ताधाऱ्यांच्या विरोधी.
- एका तासाच्या मतमोजणीनंतर भाजप सपा आणि बसपाच्या तुलनेत खूप पुढे
- उत्तर प्रदेशातील सुरुवातीचे कल भाजपच्या बाजुने, सपा बसपामध्ये काट्याची टक्कर
- पोस्टल मतांची मोजणी जवळपास पावणे नऊ पर्यंत चालणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
- पोस्टल मतांच्या मोजणीत उत्तर प्रदेशात भाजप, सपा, बसपा सर्वांची आगेकूच
- उत्तर प्रदेशात पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात
- उत्तर प्रदेशात एकूण 1 लाख 40 हजार पोस्टल मते आहेत. 
 
2012 आणि 2014 मध्ये अशी होती स्थिती.. 
1) युपी 403 जागा, बहुमत 202 जागा 
2012, 2014 चे निकाल आणि मतांची टक्केवारी 
येथे विधानसभेच्या 403 आणि लोकसभेच्या 80 जागा. 
 
पक्ष 2012 मतांची टक्केवारी 2014 लोकसभा
सपा 224 29.2% 5
बसपा 80 25.9% 0
भाजप 47 15% 73
काँग्रेस 28 11.6% 2
इतर 24 18.3% 0
 
2017 मधील 7 एक्झिट पोलमध्ये कोणाला झुकते माप ?
पक्ष 2012 जागा सरासरी
समाजावादी + काँग्रेस 224+28 122
भाजप + 47 216
बहुजन समाज पक्ष 80 56
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, भाजपच्या सेलिब्रेशनचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...