आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIADMK: पलानीस्वामींनी घेतली राज्यपालांची भेट, सरकार स्थापन करण्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना दोषी ठरवून सुप्रीम कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतरही AIADMK ने त्यांना समर्थन दर्शवले आहे. पक्षाने म्हटले आहे की शशिकला यांनी नेहमीच जयललिता यांच्यावरील संकटात त्यांना साथ दिली आहे. यावेळीही तसेच झाले आहे. शशिकला या आज आत्मसमर्पण करु शकतात, त्याआधी ई.के. पलानीस्वामी यांची AIADMK विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पलानीस्वामी यांनी त्यांच्या 124 समर्थकांच्या पत्रासह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...