आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूर/UK: मणिपूरमध्ये काँग्रेस विजयाच्या दिशेने, उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणिपूर/उत्तराखंड - देशभरातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यातील सत्ता पुढील 5 वर्षे कुणाच्या हातात असणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

मणिपूरची जनता कुणाला कौल देणार...?
मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी जनता पुन्हा मुख्यमंत्री ओकराम इबोबीसिंग यांनाच पसंती देणार की भाजपला साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तराखंडमध्ये मोदींचं तगडं आव्हान...
उत्तराखंडमध्ये सध्या काँग्रेस सरकार असून हरिश रावत मुख्यमंत्रिपदी आहेत. याठिकाणी मोदींचे तगडे आव्हान काँग्रेसला असेल. 70 जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत 68 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
 
 
उत्तराखंड : कल/निकाल (70 जागा)
 
काँग्रेस
भाजप अन्य
   11    57    02
 
 
मणिपूर : कल/निकाल (60 जागा)
काँग्रेस  टीएमसी भाजप अन्य
  27   01   22   10
 
LIVE UPDATE: उत्तराखंड
> उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरीश रावत यांना हरिद्वार ग्रामीणमधून 12000 मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
> उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळतांना दिसत आहे.
> या ठिकाणी भाजपने 54 जागेवर आघाडी घेतली आहे. 
> तर काँग्रेसला 13 जागांवर आघाडी मिळाली आहे. 
> लक्सर मतदारसंघातून संजय गुप्ता (भाजप) यांचा विजय
> प्रेमचंद अग्रवाल (भाजप) ऋषिकेशमधून विजयी
> रूद्रपूर मतदारसंघातून राजकुमार ठुकराल (भाजप) यांची बाजी
> मसुरीमधून गणेश जोशी (भाजप) यांचा विजय
> रामनगर मतदारसंघातून दीवान सिंह बिष्ट (भाजप) विजयी
> सितारगंजमध्ये मालती विश्वास (काँग्रेस) यांचा पराभव
> कोलीपौडी मतदारसंघातून मुकेश सिंह (भाजप) विजयी
> डेहराडून येथील राजपूर रोड मतदारसंघातून भाजपचे खजानदास विजयी
> चौबट्टापाल मतदारसंघातून सत्पाल महाराज (भाजप) विजयी
> भीमलाल आर्य (काँग्रेस) धनसाली मतदारसंघातून पराभूत
> सितारगंज मतदारसंघातून सौरभ बहुगुणा (भाजप) विजयी
> यमुनोत्रीमधून केदारसिंह (भाजप) विजयी
 

LIVE UPDATE: मणिपुर
> मणिपुरमध्ये भाजपला 22 तर काँग्रेसला 20 जागेवर आघाडी मिळाली आहे. 
> मणिपुरमध्ये भाजपने पहिल्यांदा सर्व 60 जागेवर निवडणूक लढवली आहे.
इबोबी सिंह विजयी...
> मणिपुरच्या थौबल येथून काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इबोबी सिंह विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार लेतंथेम बसंता सिंह यांचा पराभव केला आहे.
> याच जागेवर निवडणूक लढवणाऱ्या आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट (AFSPA) च्या विरोधात 16 वर्षे उपोषन करणाऱ्या इरोम शर्मिला यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना केवळ 85 मते मिळली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...