आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Loc Firing: Ceasefire Violation By Pakistan In J&K, Pakistan Claims 11 People Dead

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैन्याने एलओसीवर घेतला बदला, भारताने केला पाकिस्तानी कॅप्टनसह तिघांचा खात्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजौरीच्या मंजाकोटेमध्ये बुधवारी दुपारी 12:15 वाजता पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आली. - Divya Marathi
राजौरीच्या मंजाकोटेमध्ये बुधवारी दुपारी 12:15 वाजता पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आली.
श्रीनगर/ जम्मू - भारतीय सैन्याने बुधवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) १३ वर्षांतील सर्वात मोठी कारवाई केली. त्यात एका पाकिस्तानी कॅप्टनसह तीन सैनिक मारले गेले. पाकिस्तानच्या सीमा कृती दलाने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले होते. त्यापैकी एका मृतदेहाची विटबंनाही केली होती. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने सायंकाळी डीजीएमओ पातळीवरील चर्चेचा आग्रह धरला. २००३ मध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतर भारताची ही सर्वात मोठी कारवाई आहे. उल्लंघन आणि घुसखोरीला असेच उत्तर मिळेल, असा इशारा भारताचे डीजीएमओ रणवीर सिंह यांनी पाकिस्तानी डीजीओमओंना दिला आहे.
भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी कॅप्टन तैमूर अली खान, हवालदार मुश्ताक हुसेन आणि नायक गुलाम हुसेन मारले गेले. याच दरम्यान पाकिस्तानने पूंछ, राजौरी आणि गुरेज सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. चौक्यांवर १२० एमएम तोफांचा मारा केला. त्यात पूंछ व राजौरीमध्ये बीएसएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. राजौरीत एक नागरिकही जखमी झाला.

परिसरात दहशत
पाकिस्तानने बुधवारी सकाळी नौशहारा व मंजाकोट सेक्टरमध्ये दिवसभर एवढा प्रचंड गोळीबार केला की त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पाकने पूंछ जिल्ह्यातील कालाकोट व केजी सेक्टरमध्ये गोळीबार वाढवला.
बातम्या आणखी आहेत...