आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला आमचे बंकर द्या: LoC जवळील 5000 काश्मीरींची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नौशेरा (काश्मीर) - लाइन ऑफ कंट्रोल जवळ राहाणाऱ्या 5000 काश्मीरींना स्वतःचे बंकर पाहिजे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सीज फायर व्हायलेशनमुळे येथील काश्मीरींना शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कॅम्पमध्ये राहावे लागत आहे. चार महिन्यांपासून त्यांनी आपले घर सोडलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या काश्मीर दौऱ्यात हे लोक त्यांना भेटण्यासाठी आले होते. 
 
सरकारने बंकर तयार करुन द्यावे... 
- गृहमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या काश्मीरींनी मागणी केली आहे की पाकिस्तानकडून होणाऱ्या फायरिंगपासून बचाव होण्यासाठी आमच्या घरांमध्ये सरकारने बंकर तयार करुन द्यावे. नौशेरामध्ये या नागिरकांचे सध्या 6 कॅम्प आहेत. 
- जनगड येथील रहिवासी प्रश्तोम कुमार म्हणाले, 'आमची पहिली मागणी आहे की एलओसीजवळ जर आम्हाला परत राहु देणार असला तर सीमेजवळील नागरिकांच्या घरांमध्ये त्यांना बंकर बनवून द्यावे.'
- प्रश्तोम हे निर्वासितांच्या समितीची अध्यक्ष आहेत. 
- गेल्या काही महिन्यात पाकिस्तानकडून होत असलेल्या फायरिंगमध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून 6 जखमी झाले आहे. मंगळवारीही पाकिस्तानने नौशेरा येथे फायरिंग केली. 
 
अन्नापेक्षा आम्हाला बंकरची अधिक गरज 
- कुमार म्हणाले, आम्हाला अन्नापेक्षा बंकरची जास्त गरज आहे. आमच्या कुटुंबासाठी बंकरहे बुलेटप्रुफ जॅकेट आहेत. 
- कालसियान सीमेजवळील गावाचे सरपंच बहादुर चौधरी म्हणाले, 'जर आम्हाला आमच्या घरांमध्ये बंकर तयार करुन दिले तर एकही कुटुंब निर्वासित होणार नाही. मग पाकिस्तानने कितीही फायरिंग करु द्या.'
- नौशेराचे आमदार रवींदर रैना यांनी देखील नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले, त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना काही जमीन देण्याची गरज आहे. 
गृहमंत्र्यांच्या दौऱ्याने नागरिकांमध्ये विश्वास वाढेल - आमदार रैना 
- आमदार रैना म्हणाले, केंद्रीय गृह मंत्र्यांच्या दौऱ्याने सुरक्षा यंत्रणेसोबतच नागरिकांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. एलओसीजवळ राहाणाऱ्या नागरिकांच्या मनात राज्य सरकार आणि केंद्र सरकारबद्दल विश्वास निर्माण होईल. 
 
7000 बंकर तयार करण्याची योजना
 - राजनाथसिंह यांनी नागरिकांना विश्वास दिला की सीमाभागात पॅरामिलिटरी फोर्स तैनात केली जाईल. 
 - या भागातील अधिकारी शाहिद इकाबर चौधरी म्हणाले, सरकारची 7000 बंकर तयार करण्याची योजना आहे. यातील काही बंकर हे वैयक्तिक तर काही हे सामुहिक निवासस्थानासाठी असतील. यामुळे सीमाभागातील नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाऊ शकेल. या योजनेला केंद्र सरकारची अद्याप मंजूरी मिळालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...