आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha 2014 Election: MDMK BJP Formed Alliance In Tamilnadu

लोकसभेचे पडघम: तामिळनाडूत एमडीएमके-भाजप आघाडीची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप-एमडीएमके आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. एमडीएमके अण्णा द्रमुक आणि द्रमुकसोबत चर्चा करत असल्याचे वृत्त होते, त्याआधीच भाजपसोबतच्या आघाडीची घोषणा झाली आहे. यानिमित्ताने भाजप-एमडीएमके राज्यात तिसरी आघाडी म्हणून पुढे आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पॉन राधाकृष्णन आणि एमडीएमकेचे सरचिटणीस वायको यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडी जाहीर केली. नव्या आघाडीतून राज्यात नवी समीकरणे आकाराला येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 1998 पासून आमचे एमडीएमकेशी चांगले संबंध आहेत, आज आम्ही त्याची अधिकृत घोषणा करत असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. तामिळांच्या स्वतंत्र देशाबाबत (इलम) दोन्ही पक्षांचे वेगवेगळे मत आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता वायको म्हणाले, आघाडीमध्ये सर्व पक्षांचे सर्वच मुद्द्यांवर एकमत असण्याचे कारण नाही. काँग्रेसचा पराभव करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
चहावाला पंतप्रधान होऊ शकत नाही, या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर वायको यांना प्रतिक्रिया विचारली असता सुतार आणि चांभाराच्या मुलाने देशाचे नेतृत्व केल्याची उदाहरणे आहेत, असे त्यांनी सांगितले.