आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Polls 2014 6 Seats Of Assam And Tripura

मतदानाचा पहिला टप्पा: आसामात 72, त्रिपुरात 80%

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी/ त्रिपुरा - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी आसामच्या 5 आणि त्रिपुरातील एका जागेसाठी शांततेत मतदान झाले. आसाममध्ये 72.5 तर त्रिपुरा पश्चिम मतदारसंघात 80 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ही टक्केवारी यापेक्षा अधिक असू शकते, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आसाममध्ये दिब्रुगड येथे केंद्रीय मंत्री पवनसिंग घटोवार मैदानात असून, दुसरे केंद्रीय मंत्री रनी नराह लखीमपूरमध्ये आहेत. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे चिरंजीव गौरव कोलियाबोरमध्ये मैदानात आहेत.
असून येथे प्रचंड मतदान झाले. राज्यातील उर्वरित 5 जागांसाठी 12 एप्रिलला मतदान होत आहे. त्रिपुरा पूर्व मतदारसंघातही याच दिवशी मतदान होईल. दुसर्‍या टप्प्यात 9 एप्रिल रोजी 7 जागांसाठी मतदान होईल.