आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दल किनारी सर्वात लांब इफ्तार पार्टी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - येथील प्रसिद्ध दल सरोवराच्या किनारी तरुणांच्या एका गटाने शुक्रवारी आशिया खंडातील सर्वाधिक लांबीच्या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. इफ्तार पार्टीसाठी अंथरण्यात आलेले कापड १.६ किलोमीटर लांबीचे होते. याआधी दोन वर्षांपूर्वी शारजामध्ये भोजनासाठी १.३ किलोमीटर लांब कापड अंथरून इफ्तार पार्टीचा विक्रम नोंदला होता. या इफ्तार पार्टीमध्ये महिला व मुलांसह हजारो लोक सहभागी झाले होते, असा दावा संयोजकांनी केला आहे.