आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी दिसते 2000 रुपयांची बनावट नोट, पाकच्या बॉर्डरवर सुरु होता गोरखधंधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला देशाला संबोधित केलेल्या भाषणादरम्यान 500, 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्याची अचानक घोषणा केली. या निर्णयाने संपूर्ण देश हादरला. त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांची सुरु झालेली धावपळ तुम्ही पाहिली असेलच. धक्कादायक म्हणजे आता देशात बनावट नोटा छापणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

पाकिस्तानच्या बॉर्डरवरील तरणतारणमधील भिखीविंड गावात पंजाब पोलिसांनी सापळा रचून 2000 रुपयांच्या बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी 2000 रुपयांच्या 5 बनावट नोटांसह छपाईचे उपकरण जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंजाब पोलिसांनी 2000 रुपयांच्या बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक केले आहे. त्यांचा एक साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2000 रुपयांच्या पाच बनावट नोटा, स्कॅनर आणि कॉम्प्यूटर जप्त केले आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...