आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला इन्स्पेक्टरची \'दबंग\'गिरी, शिक्षक पतीला शाळेत जावून बेल्टने मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाबाद- हरियाणातील फरीदाबाद पोलिस लाइनमध्ये तैनात एका महिला सब इन्स्पेक्टरने (एसआय) तिच्या भावांच्या मदतीने शिक्षक पतीला त्याच्याच शाळेत जावून बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर-21 डीमधील सरकारी शाळात ही घटना घडली.

पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिला इन्स्पेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शाळेतील एका शिक्षणकाने याघटनेचा व्हिडिओ मोबाइल कॅमेर्‍याद्वारे शूट केला आहे.

काय आहे प्रकरण...?
- सब इन्स्पेक्टर पत्नी व शिक्षक पतीमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरु आहे.
- रोहतक येथील रहिवासी शिक्षक हितेंद्रने पोलिसांना सांगितले की, 10 वर्षांपूर्वी त्याचा विवाह हरियाणाची पोलिस सब इन्स्पेक्टर सुनीताशी झाला.
- दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे.
- हितेंद्र व सुनीतामध्ये मागील अनेक महिन्यांपासून मदभेद निर्माण झाले आहे.
- सुनीता आपल्या मुलासोबत पोलिस लाइनमधील क्वार्टरमध्ये राहाते.
- हितेंद्र दुसर्‍या महिलेसोबत राहात असल्याचा आरोप सुनीताने केला आहे. तो मागील सात-आठ महिन्यांपासून घरी आला नसल्याचेही तिने म्हटले आहे.
- 11 एप्रिलला सुनीताचे भाऊ मनीष व बलवंत पोलिस लाइनमध्ये आले.
-तिघे हितेंद्रची समज काढण्यासाठी शाळेत गेले.
- मात्र, हितेंद्रने पत्नी सुनीताच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने सुनीतासह तिच्या भावांनी हितेंद्रला बेदम मारहाण केली.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो व व्हिडिओ... लेडी एएसआयने दोन भावांच्या मदतीने बेल्टने असे बदडले शिक्षक पतीला...
बातम्या आणखी आहेत...