आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीत विरोधात समन्स जारी, गुरुमीत जेलमध्ये रात्रभर ओरडत होता- माझा काय दोष...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - रॉकस्टार बाबा गुरमीत राम रहिम तुरुंगात रात्रभर किंचाळत होता. 'मी काय केले, माझा गुन्हा काय'. पहिले दोन दिवस त्याने फक्त फलाहार घेतला आणि मिनरल वॉटर प्यायला होता. दोन साध्वींच्या बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या राम रहिमला रोहतकमधील सुनारिया जेलच्या अप्रुवर सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
 
बाबावर नजर ठेवण्याची जबाबदारी दोन जुन्या कैद्यांवर सोपविण्यात आली आहे. ही सर्व माहिती त्याच्या सेलजवळ ठेवण्यात आलेल्या एका स्थानिक दलित नेत्याने जामीनावर सुटल्यानंतर दिली. दुसरीकडे राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीत विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
 
पंचकुलाचे डीसीपी मनबीरसिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  25 ऑगस्टला राम रहिमला सीबीआय कोर्टाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले होते. 28 ऑगस्टला त्याला रोहतक जेलमध्ये झालेल्या सुनावणीत 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 
पहिले दोन दिवस अन्न शिवले नाही
- राम रहिमच्या शेजारी कैदेत असलेला आणि आता जामीनावर सुटलेला दलित नेता स्वदेश किराड याने सांगितले, की 25 आणि 26 ऑगस्टला राम रहिमने काहीच खाल्ले नाही. तुरुंगातून त्याने त्याच्या खात्यावरुन मिनरल वॉटरची एक बॉटल तेवढी घेतली. याशिवाय काही फळे घेतली. 
- अप्रुवर सेलमध्ये बंद केल्यानंतर तो हात जोडून मला येथे ठेवून नका. मी येथे राहू शकत नाही. मला भीती वाटते, असे ओरडत होता. त्यानंतर रात्रभर तो ‘मैं कि कित्ता ए, साड्डा कि कसूर ए...’ असे ओरडत होता. 
 - बाबाला सेलमधून बाहेर काढले जात नाही. त्याचे वकील गुरदाससिंग गुरुवारी त्याच्या भेटीला आले होते, याशिवाय कुटुंबियांपैकी कोणीही त्याच्या भेटीसाठी आले नाही. 
- किराडने सांगितले, की रोहतक जेलमध्ये साधारण 1300 कैदी आहेत. रोज जवळपास 150 कैद्यांची कोर्टात तारीख असते. कोणाची केस हायकोर्टात सुरु असते तर कोणी जामीनासाठी अर्ज केलेला असतो. अनेक कैद्यांच्या मानवाधिकारांचे हनन होत असते. 
- स्वदेश किराड सरकारी वाहनांच्या तोडफोड प्रकरणात नऊ महिने कैदेत होता.
बातम्या आणखी आहेत...