आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्‍ये सिने स्‍लाइल लुटले अॅक्सिस बँकेचे 1.65 कोटी रुपये; वाचा कसे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्‍थळाची पाहणी करताना पोलिस. - Divya Marathi
घटनास्‍थळाची पाहणी करताना पोलिस.
लुधियाना (पंजाब) - पोलिस असल्‍याची बतावणी करून चेकिंकसाठी सहा व्‍यक्‍तींनी अॅक्सिस बँकेची कॅश व्‍हॅन थांबवली आणि बंदुकीच्‍या धाकावर 1.65 कोटी रुपये लुटल्‍याची घटना आज (सोमवारी) मोगा जिल्‍ह्यातील लुधियाना-फिरोजपूर महामार्गावर मोगापासून 10 किलोमीटर दूर किल्ली चाहल गावाजवळ घडली. यातील तीन व्‍यक्‍ती पोलिसांच्‍या गणवेशात तर तीन साध्‍या गणवेशात होत्‍या.
अशी घडली घटना ?
अॅक्सिस बँकेने कॅशची ने आ‍ण करण्‍यासाठी करार पद्धतीने एका खासगी कंपनीकडून व्‍हॅन किरायाने घेतली होती. लुधियाना-फिरोजपूर मार्गावर सोमवारी सहा व्‍यकतींनी ही व्‍हॅन थांबवली. त्‍यातील तिघे पोलिसांच्‍या गणवेशात तर तिघे साध्‍या गणवेशात होते. गाडी थांबताच या सहा व्‍यक्‍तींनी दोन्‍ही बाजूने तिला घेराव घातला आणि बंदुकीच्‍या धाकावर गाडीतील कर्मचा-यांना खाली उतरवले. त्‍यानंतर हे सहाही व्‍यक्‍ती गाडीत बसून, चूहड़चक्ककडे निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, आरोपी मिळाले नाहीत.
छायाचित्र -रविंदर भाटिया
पुढच्‍या स्‍लाइडवर पाहा, संबंधित PHOTOS: