फोटो - प्रतिकात्मक
संभल/मुरादाबाद - युपीच्या बहजोईमध्ये काही गुंडांनी एका वैवाहिक दाम्पत्याबरोबर अत्यंत क्रूरवर्तन केल्याचे समोर आले आहे. गुंडांनी आधी पतीला बंधक बनवले आणि त्यानंतर त्याच्यासमोरच त्याच्या आठ महीन्यांच्या गर्भवती पत्नीवर बलात्कारही केला. त्यानंतर त्यांनी महिलेची हत्या केली आणि रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांना अजुनही चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही.
ही घटना शनिवारी मध्यरात्री नंतरची आहे. पीडित पती जयपाल उर्फ छैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार तो
आपल्या पत्नीबरोबर घरात झोपलेला होता. त्यावेळी काही गुंडांनी आत प्रवेश केला. त्यांनी सर्वांनी तोंड कापडाने बांधलेले होते आणि हातात हत्यारे होती. त्यांनी छैनी यांचे हात पाय बांधले आणि त्यांच्या समोरच त्यांच्या पत्नीवर बलात्कार करून तिची गळा दाबूनु हत्या केली. ब-याच वेळानंतर छैनी कसाबसा सुटला आणि त्याने पत्नीचे शरीर झाकले.
दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला असून अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी काही सांगता येईल असे स्पष्ट केले आहे. छैनी यांनी चोरट्यांनी घरातील दहा हजार रुपये रोख, दागिने आणि दोन मोबाईल असा ऐवज पळवल्याची तक्रार नोंदवली आहे.