आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lord Hanuman News In Marathi, Hanuman Chalisa, Divya Marathi

सव्वा कोटी भक्त एकाच वेळी हनुमानचालिसा पठन करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - येत्या 8 एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने हनुमानचालिसाच्या भव्य पाठांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील तसेच विदेशातील जवळपास सव्वा कोटी हनुमानभक्त एकाच दिवशी एकाच वेळी हनुमानचालिसा पठन करतील. आयोजनाचे हे सहावे वर्ष असून यंदाच्या महापाठाचा विषय ‘श्री हनुमान चालिसा आणि आपले अपत्य’ असा आहे. हा मुख्य कार्यक्रम रायपूरमध्ये होत असून महापाठांचे थेट प्रसारण आस्था चॅनल तसेच आयबीसी 24 इत्यादी चॅनल्सवर संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान होईल.


जीवन प्रबंधन समूह तसेच महापाठ आयोजन समितीद्वारे जीवन प्रबंधन गुरू पं. विजयशंकर मेहता यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गोयल, शिवनारायण मुंदडा तसेच विजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणचे संयोजक विविध मंदिर, स्टेडियम, बगिचे, सभागृह, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी सामूहिक पाठांचे आयोजन करतील. अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड, हॉलंडसह पाकिस्तानातही हनुमानचालिसा पाठांचे आयोजन केले जाणार आहे.