आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे कपडे घालूनच दिवाळी साजरी करते हे राजघराणे, विचित्र परंपरेचे हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरचे राजघराणे काळे कपडे घालूनच दिवाळी साजरी करते. - Divya Marathi
जयपूरचे राजघराणे काळे कपडे घालूनच दिवाळी साजरी करते.
जयपूर - देशात अनेक तऱ्हेने दिवाळी साजरी केली जाते३ या दिवशी सर्व रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिवाळी साजरी करतात. तथापि, जयपूरचे राजघराणे काळे कपडे परिधान करूनच दिवाळीचा उत्सव साजरा करते. हे एखाद्या दु:खामुळे नाही, तर त्यांची शतकांपासून चालत आलेली परंपरा आहे. माजी राजा सवाई जयसिंह द्वितीय यांचे वंशज नेहमी काळे कपडे घालूनच दीपावली साजरी करतात.
 
अशी आहे परंपरा...
- माजी राजघराण्यातील सदस्यांनुसार, 10व्या शतकात कछवाहाचे राजा \'सोध देव\'चा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावाने सिंहासनावर कब्जा केला, तेव्हा त्रस्त होऊन राणी आपला पुत्र \'दुल्हा राय\'ला घेऊन राजस्थानच्या खोह परिसरात आली.
- खोहचे राजा चंदा मीनाने राणीला बहिणीसारखा सन्मान दिला आणि दुल्हा रायच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली. यानंतरच दिवाळी अशी काळे कपडे घालून साजरी करण्यात येऊ लागली.
 
असे आहे हे राजघराणे...
- 21 ऑगस्ट 1912ला जन्म झालेल्या राजा मानसिंह यांनी तीन लग्ने केली होती. पहिले लग्न 1924मध्ये वयाच्या 12व्या वर्षी जोधपूरचे महाराजा सुमेरसिंह यांची बहीण मरुधर कंवरशी झाले होते.
- मानसिंह यांचे दुसरे लग्न त्यांच्या पहिल्या पत्नीची भाची किशोर कंवर यांच्याशी 1932 मध्ये झाले. यानंतर 1940 मध्ये त्यांनी गायत्री देवींशी तिसरा विवाह केला.
 
12 वर्षांच्या वयातच पद्मिनीदेवींचा नातू झाला राजा
- महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधर कंवर यांना पुत्ररूपात भवानी सिंह झाले. भवानी सिंहांचे लग्न पद्मिनीदेवींशी झाले होते. त्यांना दिया कुमारी ही एकुलती एक मुलगी आहे.
- नंतर दिया कुमारींचे लग्न नरेंद्र सिंहांशी झाले. त्यांना दोन मुले झाली पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह, तर मुलगी आहे गौरवी. दिया सध्या सवाई माधोपूर येथून भाजप आमदार आहेत.
- पद्मनाभ सिंहने वयाच्या 12व्या वर्षी जयपूर रियासत सांभाळायला सुरुवात केली. तर दुसरा मुलगा लक्ष्यराज सिंहने वयाच्या अवघ्या 9व्या वर्षीच ही जबाबदारी सांभाळली.
- तथापि, देशात आता पूर्णपणे राजेशाही संपुष्टात आलेली आहे. पण तरीही राजघराण्यांत परंपरेच्या रूपात राज्याभिषेक केला जातो. याद्वारे राज्याचा वारसाहक्क प्रतीकात्मक रूपात पुढे हस्तांतरित केला जातो.
 
अशी आहे लाइफस्टाइल
- महाराणी पद्मिनी देवी नेहमी शहरात होणाऱ्या लहान मोठ्या कार्यक्रमांत चीफ गेस्ट म्हणून हजर असतात.
- दुसरीकडे, त्यांची मुलगी दिया कुमारी सवाई माधेपूर येथून एमएलए आहे. त्या नेहमी राजस्थानात होणाऱ्या अनेक इव्हेंट्समध्ये दिसतात.
- यासोबतच दिया कुमारींचा मुलगा आणि जयपूरचे राजे पद्मनाभ सिंह भारतीय पोलो टीमचे खेळाडू आहेत.
- हा शाही परिवार जयपुरात होणाऱ्या रॉयल समारंभांत अनेकदा दिसून येतो.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या राजपरिवाराचे आणखी काही निवडक फोटोज
बातम्या आणखी आहेत...