आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहालजवळ हिंदू-मुस्लिम प्रेमीयुगुलाचा ब्लेडने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- हिंदू युवक आणि मुस्लिम युवती. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. मात्र, दोघे अांतरजातीय असल्याने त्यांच्या विवाहाला घरच्यांनी विरोध केल्याने या प्रेमीयुगुलाने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताजमहालपासून जवळच असलेल्या 'ताज नेचर वॉक'मध्ये बुधवारी ही घटना घडली.
युवक आणि युवतीने ब्लेडने गळा कापून घेत आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केला. दोघे उद्यानात तडफडत असताना वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाहिले. दोघांना तातडीने एसएन मेडिकल कॉलेजच्या हास्पिटलमध्ये रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांची प्रकृती स्थीर असल्याचे वैदयकीय सूत्रांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण...
जीव सिंह असे युवकाचे असून तो देहरादूनचा रहिवासी आहे. युवती ही मुस्लिम असून ती आग्रा येथील रहिवासी आहे. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे दोघांनी ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांच्या आई-वडिलांना बोलावून घेतले आहे. मात्र, दोघे अजून जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.