आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलांचे मुंडण करून गावातून काढली धिंड; तरुणीच्या अर्जावरून तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्णिया- रूपोली ठाण्याच्या हद्दीत वसंतपूर पंचायत येथील एका प्रेमीयुगुलास गावातील पंचांनी छळ केला. त्यानंतर या दोघांना मारहाण केली. गावकऱ्यांनी दोघांचे मुंडण करून गावातून धिंडही काढली. शेवटी याच गावातील पंचांनी त्यांचा निकाह लावून दिला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार नाेंदवली आहे.

गावातील सरबिना आणि तिचा प्रियकर महंमद तौफिक यांनी ठाण्यात जेव्हा लेखी तक्रार दाखल केली तेव्हा कुठे या प्रकरणाला वाचा फुटली. सरबिनाने तक्रारीत म्हटले : वॉर्डातील पंच मैदिन खातून, महंमद सब्बन, महंमद मुन्नू, महंमद वसीम यांनी या दोघांना गावातच पकडलेे. वास्तविक हे दोघेही लग्न करण्याच्या उद्देशानेच पळून चालले होते. या लोकांनी त्यांना भवानीपूर बसस्थानकापासून मारहाण करत गावात आणले. एका खोलीत दोघांनाही डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या लोकांनी गावातील प्रमुख, समिती सदस्य तसेच पंचायतीतील सरपंचांना बोलावून घेतले. सर्वांसमक्ष या दोघांचे मुंडण करण्यात आले. त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. त्यानंतर सर्व लोकांनी गावातील मौलवीस बोलावून घेतले. त्यांचा निकाह लावून देण्यात आला. यापुढे दोघेही गावात दिसले तर खबरदार ! असेही त्यांना धमकावण्यात आले.

आमच्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप समितीचे सदस्य महंमद रियाजूद्दीन यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून तक्रारीत नावे असलेल्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी छापे टाकणे सुरू केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही, असे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...