आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीच्या प्रचारात लव्ह जिहाद मुद्दा; खासदार योगी आदित्यनाथ यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तरप्रदेशात पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी "लव्ह जिहाद' हा पक्षाचा मुख्य मुद्दा असेल असे भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशात सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या एक आणि विधानसभेच्या ११ जागांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. त्यासाठी १३ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचार प्रमुखाची जबाबदारी सोपवली आहे.
गोरखपूर येथून निवडून गेलेले खासदार योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. त्यांनी शुक्रवारी सांगितले की, मी गेल्या चार - पाच वर्षांपासून "लव्ह जिहाद'च्या मु‌द्यावर आवाज उठवतारे आहे. सर्वप्रथम हा प्रकार केरळमध्ये सुरू झाला होता. तो आता पश्चिमी उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. सर्वात दु:खद आणि धक्कादायक बाब म्हणजे उत्तर प्रदेशातील समाजवादी सरकार या मुद्याकडे डोळेझाक करत मूक भूमिका घेत आहे. काही दिवसांपूर्वी वृंदावनमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात "लव्ह जिहाद'च्या मुद्यावर चर्चा होऊन तो प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. परंतु त्याचे तीव्र पडसाद उमटल्याने वाद टाळण्यासाठी अखेरच्या क्षणी तो मागे घेण्यात आला होता. पक्षानेही या मुद्यावर अद्याप उघडपणे कोणती भूमिका घेतली नव्हती.

वादग्रस्त व्हिडीओमुळे आदित्यनाथ चर्चेत
खासदारआदित्यनाथ योगी यांच्यासंदर्भातील एक व्हिडीओ उजेडात आला आहे. त्यात ते समर्थकांना म्हणतात की जर मुस्लिम समुदायाचे लोक एका हिंदू मुलीला घेऊन जात असतील आपणही त्यांच्या शंभर मुली आणाव्यात. हा व्हिडीओ पाच वर्षांपूर्वीचा असल्याचे म्हटले जात आहे. योगी यांनी हा व्हिडीओ कटपेस्ट केल्याचा दावा करत त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.