आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांचे प्रेम, 2 महिन्यांचे वैवाहिक आयुष्य, या शुल्लक कारणावरुन सगळेच संपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी (उत्तर प्रदेश)- दोघांचे चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केले होते. आता त्यांच्या आयुष्यात नवचैतन्याची, उत्साहाची, आनंदाची सोनेरी पहाट झाली होती. दोघांनी स्वप्नातील महाल बांधण्याचे काम हाती घेतले होते. आता बंगल्याचे फिनिशिंग केवळ शिल्लक होते. पण काल अचानक सर्वांनाच धक्का बसला. त्याने आधी तिच्या कपाळावर गोळी घातली. त्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- येथील मसीहागंज परिसरात जय सिंह अहिरवार (30 वर्षे) राहत होता. त्याचा मांडवाचा बिझनेस होता.
- 10 एप्रिल 2016 रोजी त्याने मोनिका कुशवाहा हिच्यासोबत कोर्ट मॅरेज केले.
- जय केवळ दहावी पास होता. पण मोनिका शासकीय शिक्षिका होती.
- दोघांनी नवीन बंगल्याचे बांधकाम सुरु केले होते. ते बघण्यासाठी दोघे कारने गेले होते.
- या दरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली. त्याने आधी मोनिकाच्या कपाळावर गोळी झाडली.
- त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
- या इमारतीजवळ लोकवस्ती नाही. त्यामुळे गोळी झाडल्याचा आवाज लोकांना गेला नाही.
- काही वेळाने त्यांच्या घरातील लोक जेव्हा या इमारतीत आले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
- दोघांचे मृतदेह आजूबाजूला पडले होते. जयचा हात मोनिकाच्या पर्समध्ये होता.
चार वर्षांच्या अफेअरनंतर केले लग्न
- 4 वर्षांच्या अफेअरनंतर जय आणि मोनिका यांनी लग्न केले होते.
- मोनिकाच्या घरुन या लग्नाला जोरदार विरोध होता. पण जयच्या कुटुंबीयांच्या पाठिंबा होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, अशी झाली होती दोघांची ओळख... फेसबुक लिहिले होते 'आई मिस यू'... यामुळे घटली असावी ही घटना....
बातम्या आणखी आहेत...