आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरूणी म्हणाली प्रियकरासोबत जगेल-मरेल, कुटुंबीयांना पसंत नसेल तर गोळया घाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- छतरपूर जिल्ह्यातील बिलहरी गावातून 19 नोवेंबरच्या रात्री घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर जोडप्याने पोलिसांना आर्य समाज मंदिरात लग्न केल्याचे पूरावे दाखवले आहेत. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी दोघांना एसडीएम कोर्टात सादर करून जबाब नोंदवले. युवतीने पोलिसाशी स्पष्टपण बोलताना सांगितले की, तुम्ही माझ्या तीन गोष्टी स्पष्टपण ऐका, आम्ही दोघे सोबत राहू, सोबतच जगू आणि सोबतच मरू. यानंतर पोलिसांनी कस्टडीतील प्रेमी युगुलाला युवकाच्या एका नातेवाईकांकडे पाठवून दिले.


लहान भाऊ-बहिन रस्त्यावर येऊन रडू लागले...
एसडीएम कार्यालय ते पोलिस ठाण्या दरम्यान युवतीचे कुटुंबीय तिला छोटा भाऊ-बहिण रडत असल्याचे सांगितले, पण तिचे त्यांचे काहीही ऐकले नाही. तिने प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गावातून तीन दिवसांपूर्वी आरती  रैकवार ही आपला प्रयकर जितेंद्र सोनी याच्यासोबत पळून गेली होती. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात पोलिसांत निवेदन दिले होते. पोलिसांनी युवतीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली होती, तसेच युवकाच्या कुटुंबीयांच्या निवेदनावरून चौकशी सुरू केली होती.


पसंत नसेल तर मारून टाका...
एसडीएम कोर्टात आणि माध्यामांना दिलेल्या प्रतिक्रियेत आरतीने म्हटले आहे की, आता यांच्यासोबत राहील आणि यांच्यासोबत मरेल. जर कुटुंबीयांना पसंत नसेल, तर गोळी घालून मारून टाका. 


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...