आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Love Marriage Too Often Used To Quarrel Feroz And Indira, Nehru Not Approve Of This

आधी लव्ह मॅरेज मग भांडणे, अशा आहेत इंदिरा- फिरोज गांधींच्या सीक्रेट स्टोरीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फिरोज आणि इंदिरा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात जाऊन ब्रिटनच्या मशिदीत 1942 मध्ये लग्न केले होते. लग्नाची गोष्ट जेव्हा नेहरूंना कळली तेव्हा खूप नाराज झाले आणि मग महात्मा गांधींनी मध्यस्थी करून दोघांना आपले 'गांधी' आडनाव दिले. फिरोज आणि इंदिरा यांचे प्रेम कॉलेजच्या दिवसांपासूनच सुरू होते. 8 सप्टेंबर 1960 रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या फक्त 48व्या वर्षी फिरोज गांधी यांचे निधन झाले. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला इंदिरा आणि फिरोज गांधीं यांचे काही किस्से सांगत आहे.
 
लव्ह मॅरेज आणि मग भांडणे...
- फिरोज आणि इंदिरा गांधींमध्ये नेहमी भांडणे होत होती. परंतु, ही भांडणे मुलांच्या संगोपनावरून व्हायची. 1944 मध्ये राजीव यांच्या जन्मानंतर दोघेही पती-पत्नी वेगळे झाले. इंदिरा गांधी आपल्या वडिलांच्या घरी आल्या, तर फिरोज आनंद भवन इलाहाबादमध्ये राहत होते.
- इंदिरा गांधी यांच्या बायोग्राफीमध्ये उल्लेख आहे की, जेव्हा इंदिरा गांधी आपल्या वडिलांच्या घरी निघून गेल्या, तेव्हा फिरोज यांना लखनऊच्या एका प्रसिद्ध जमीनदार मुस्लिम परिवारातील एका महिलेशी प्रेम झाले.
- 1946 मध्ये इंदिरा दुसऱ्यांदा गर्भवती होती, त्या वेळी दोघांतील संबंध आणखी बिघडले.
 
जेव्हा फिरोज यांना आला हृदयविकाराचा झटका
- ही 1958ची गोष्ट आहे जेव्हा फिरोज यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्या वेळी इंदिरा आपल्या वडिलांसह भूतान दौऱ्यावर होत्या. इंदिरा दौऱ्याहून परत येईपर्यंत फिरोज यांची प्रकृती धोक्याबाहेर आली होती.
- या घटनेनंतर कुठे दोघांतील नाते पुन्हा ठीक झाले. मग फिरोज आपल्या दोन्ही मुलांसह 1 महिना सुटी घालवण्यासाठी श्रीनगरला गेले. परंतु बहुतेक ही त्यांची शेवटची सोबत होती.
 
श्रीनगरची ट्रिप ठरली शेवटची फॅमिली ट्रिप
- 1 महिना सुटी घालवून कुटुंब परत आल्यावर काँग्रेस अध्यक्ष म्हणून इंदिरा यांचे नाव पुढे आले. हा इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्यावर शेवटचा आघात होता. यानंतर त्यांचे संबंध कधीच ठीक झाले नाहीत.
- वयाच्या 41 व्या वर्षी इंदिरा गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या, तर दुसरीकडे 48व्या जन्मदिनाआधीच फिरोज गांधींचे निधन झाले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, फिरोज आणि इंदिरा गांधींचे रेअर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...