आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायव्हर-मालकीनची लवस्टोरी: प्रेमीयुगुलाने 150 फूट उंच डोंगरावरून घेतली उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: रुग्णालयात उपचार घेताना नेहा (मालकीन))
सीकर- शाकंभरी भागात शुक्रवारी सकाळी एका प्रेमीयुगुलाने 150 फुट उंच डोंगरकड्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी हातात हात घेऊन डोंगरकड्यायवर रस्त्यावर उड्या घेतल्या. दोघी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जयपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. संबंधीत महिला घटस्फोटीत असून तरुण हा महिलेच्या घरी मागील पाच वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करतो.
मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मणगड येथील रहिवासी मनोहर लाल सैनी व ठाणे (महाराष्ट्र) येथील रहिवासी नेहा लोहिया शुक्रवारी सकाळी शाकंभरी भागातील डोंगरावर गेले होते. अचानक दोघांनी 150 फुट उंच डोंगरकड्यावरून रस्त्यावर उडी घेतली. जमिनीवर पडल्यानंतर दोघांना गंभीर दुखापत झाली. दोघांचा रडण्याचा आवाज आल्याने स्थानिक मेंढपाळ त्यांच्या मदतीसाठी धावले. दोघांना जखमी अवस्थेत पाहुन त्यांनी ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांना रुग्णालयात हलवले.
आमचे एकमेकांवर प्रेम आहे...
नेहा आणि मनोहर या प्रेमीयुगुलाची सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे. 'आमचे एकमेकांवर प्रेम असून सोबतच मरण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे हे पाऊल उचलत आहे.', असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळी एक पिशवी देखील सापडली आहे. त्यात नेहाचे बॅंक एटीएम कार्ड आणि काही महत्त्वाचे दस्ताऐवज आहेत. तसेच ठाणे-जयपूर रेल्वेचे तिकिट आहे.

असे जुळले नेहा आणि मनोहर प्रेम...
नेहा लोहिया ठाण्यात राहाते. मनोहर सैनी हा नेहाचा ड्रायव्हर आहे. मागील पाच वर्षांपासून तो नेहाच्या करी काम करत आहे. यादरम्यान दोघांचे प्रेम जुळले. नेहा घटस्फोटीत आहे. ती ठाण्यात आपल्या कुटुंबासोबत राहाते. तसेच नेहाचे काही नातेवाइक लक्ष्मणगड येथेही राहातात. त्यामुळे मनोहर सैनीला त्यांनी काही दिवसांपूर्वी सीकर येथे बोलावले होते. नंतर त्याने नेहाला देखील बोलावून घेतले. परंतु, आपल्या प्रेमाचा नातेवाईक स्विकार करणार नाहीत, म्हणून दोघांनी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...