आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story चा रक्तरंजित शेवट, म्हणाला- माझी नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत रंजना आणि आरोपी दीपक - Divya Marathi
मृत रंजना आणि आरोपी दीपक
बांसवाडा (राजस्थान) - शाळकरी वयापासून एकमेकात गुंतलेल्या विद्यार्थ्यांच्या लव्ह स्टोरीचा दुर्दैवी अंत झाला. जवळपास अडीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात राहिलेल्या प्रियकराने प्रेयसिची चाकूने भोसकून हत्या केली. युवतीच्या नकाराने बेभान झालेल्या प्रियकराने तिच्या गळ्यावर, छातीवर चाकूने सपासप वार केले. पोलिस चौकशीत त्याने सांगितले, की जर ती माझी होऊ शकत नव्हती तर मग दुसऱ्या कोणाचाही होऊ नये म्हणून संपवून टाकले.
शाळेतून सुरु झालेली लव्हस्टोरी कॉलेजमध्ये येऊन संपली
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रंजना आणि आरोपी दिपक यांच्यात अडीच वर्षांपासून अफेअर सुरु होते. 11वी पर्यंत दोघे एकाच शाळेत होते.
- तेव्हापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. शाळेमध्ये दोघेही चांगले विद्यार्थी म्हणून परिचीत होते.
- शाळा संपल्यानंतर रंजनाने कन्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तर, दीपक राजकीय गोविंद गुरु महाविद्यालयात गेला.
- दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयात असले तरी रोज सोबतच येणे-जाणे करत होते. या वर्षी दोघेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षण सुरु होते.

नकार दिल्याने केला खून
- आरोपी दीपकने पोलिसांना सांगितले, की आमच्यात 15-20 दिवसांपासून बोलचाल बंद होती. ती माझ्यावर रागावलेली होती. 16 जून रोजी मागील सर्व वाद विसरून मी तिला भेटायला गेलो.
- मात्र रंजना काही एक ऐकून घेण्यास तयार नव्हती. ती फार रागात होती.
- मंगळवारी कळाले की ती घराबाहेर पडली आहे. तेव्हा मी देखील सर्व तयारी करुन निघालो. रंजनाने पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला.
- यावेळी त्यांच्यात काहीवेळ मारहाण झाली. त्यानंतर दीपकने रंजनाचे केस पकडले खाली पाडले. रंजना खाली पडल्याबरोबर दीपकने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला आणि म्हणाला, 'तु माझी होणार नसशील तर तुला दुसऱ्याचीही होऊ देणार नाही.'

घरच्यांना दोघांच्या मैत्रीबद्दल काहीच माहित नाही
- पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीसाठी रंजनाच्या कुटुबीयांना बोलावून घेतले आणि रंजना व दीपक यांच्याबद्दल चौकशी केली. त्यावर त्यांनी आम्हाला याबद्दल काहीच माहित नसल्याचे सांगितले.
- आरोपीच्या अटकनंतर सर्व सत्य बाहेर आले. त्याच्या मित्रांकडूनही पोलिसांना अधिक माहिती मिळाली.
- मित्रांनी सांगितले की दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, ते लग्न करणार होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात काही कारणांमुळे भांडण झाले होते आणि रंजना नाराज होती.
पुढील स्लाइडमध्ये,
>> मृतदेह रस्त्यावर ठेवून कुटुंबीयांनी केला रास्तारोको
>> युवतीचा पंजाबी ड्रेस रक्ताने माखला होता

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...