आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी होती जगातील 10 सौंदर्यवतींच्या पंक्तीतील एक महाराणी गायत्रीदेवीची LOVE STORY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरचे शेवटचे महाराज सवाई मानसिंह यांचा आज जन्मदिन आहे. या निमीत्ताने divyamarathi.com त्यांच्या प्रेमकथेबद्दल सांगत आहे. त्याचे कारण देखील विशेष आहे. त्यांचा विवाह ज्या महिलेसोबत झाला ती जगातील पहिल्या 10 सुंदर महिलांपैकी एक होती. नाव होते महाराणी गायत्रीदेवी. चला तर जाणून घेऊ या, सवाई मानसिंहांनी कसे केले होते आपल्या प्रेयसीला प्रोपज...
दिवंगत महाराणी गायत्री देवींच्या बायोग्राफीतून..
'अ प्रिंसेस रिमेम्बर्स' या पुस्तकातील हा संपादित भाग आहे. यात सवाई मानसिंह द्वितीय यांना त्यांची पत्नी गायत्रीदेवी जय संबोधतात. हे पुस्तक त्यांच्या पहिल्या भेटी संदर्भातील आणि त्यानंतर त्यांचे नाते घट्ट होण्याचा उलगडा करुन देते.

ही गोष्ट 1931 ची आहे. जय कोलकात्यात पोलो सीजन सुरु असल्या कारणाने आमच्यासोबत राहात होते. हिरव्या रंगाच्या रोल्स रॉइसमधून ते आले होते. तेव्हा त्यांचे वय साधारण 21 आणि माझे 12 वर्षे असेल. लहानपणी मी त्यांना महाराजा ऑफ जयपूर आणि युवर हायनेस असे संबोधत होते.

मी तेव्हा इंग्लंडमधील वुलिच मिलिटरी अॅकॅडमीमधून ट्रेनिंग पूर्ण करुन आले होते. कोलकत्याहून परतल्यानंतर त्यांनी जयपूर पोलो टीम तयार केली होती. तेव्हा मी माझ्या उरी एक स्वप्न बाळगले होते. परीकथांपेक्षा ते अगदी उलट होते. मी विचार करत असायचे की अशी काही जादू व्हावी आणि मी राजकुमाराच्या घोड्याची देखभाल करणारी झाली पाहिजे. जेणे करुन मी माझ्या हाताने छडी त्यांच्या हातात देऊ शकेल आणि त्यानिमीत्ताने त्यांच्या हाताला मला स्पर्ष करता येईल.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, प्रपोज करताना का म्हणाले होते महाराज मानसिंह