आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्राध्यापकाचे 30 वर्षे लहान विद्यार्थीनीवर जडले होते प्रेम, चर्चेत होती LOVE STORY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राध्यापक मटुकनाथ आणि त्यांची ३० वर्षे लहान प्रेयसी जूली. - Divya Marathi
प्राध्यापक मटुकनाथ आणि त्यांची ३० वर्षे लहान प्रेयसी जूली.
पाटणा (बिहार) - मटुकनाथ आणि जूली ही नावे तुम्हाला आठवत असतील. प्रोफेसर मटुकनाथ आणि त्यांची विद्यार्थीनी जूली यांच्यात ३० वर्षांचे अंतर होते. या दोघांना एकमेकांपासून कोणतीही तक्रार नव्हती मात्र समाजाला असलेल्या तक्रारीमुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या सर्व अडचणींवर मात करुन त्यांनी नाते जपले, एकमेकांना खंबीर साथ दिली. सध्या हे जोडपे लग्नाशिवाय आनंदाने लिव्ह-इनमध्ये राहात आहे.
कशी सुरु झाली होती, यांची लव्ह स्टोरी...
- दोघांची पहिली भेट कॉलेजच्या क्लासरुममध्ये झाली होती. २००४ मध्ये मटुकनाथ यांनी एक कॅम्प आयोजित केला होता. त्यात जूलीचाही सहभाग होता.
- या दरम्यान दोघांमध्ये बोलणे सुरु झाले होते. त्यानंतर दोघे फोनवर एकमेकांशी तासनतास बोलत राहात होते.
जूलीने केले होते प्रपोज
- प्रोफेसर मटुकनाथ यांची विद्यार्थीनी राहिलेल्या जूलीने सरांना प्रपोज केले होते. याबद्दल मटुकनाथ यांनी सांगितलेला किस्सा असा आहे, एक दिवस जूलीचा फोन आणि ती म्हमाली, मला तुम्ही आवडता आणि मला तुमच्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे.
- वास्तविक जूलीने इच्छा व्यक्त केली आणि मटुकनाथ यांनी तत्काळ होकार दिला, असे झाले नव्हते. त्यांनी तिला हे शक्य नसल्याचे समजावून सांगितले.
- त्यांनी सांगितले, ते विवाहित आहेत. त्यांना मुले आहेत. मात्र नंतर त्यांच्याही मनात जूलीविषयी प्रेम निर्माण झाले.
- साठीपार मटुकनाथ बिहारमधील भागलपूर येथे एक 'प्रेम पाठशाला' उघडणार असल्याची माहिती आहे.
- त्यांनी याबाबत सांगितले, की पाटण्यातील त्यांच्या घराचे जवळपास ४० हजार रुपये भाडे त्यांना मिळते. एवढी रक्कम त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसी आहे.
- त्यांनी हे देखील सांगितले की या प्रोजेक्टवर आतापर्यंत १० लाख रुपये खर्च झाले आहेत.
२००६ मध्ये आल्या होत्या अडचणी
- जूलीसोबतच्या प्रेम संबंधामुळे पाटणा विद्यापीठाशी सलग्न बीएन कॉलेजने १५ जुलै २००६ रोजी मटुकनाथ यांना महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील रिडर पदावरुन सस्पेंड केले होते.
- त्यानंतर २० जुलै २००९ रोजी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. एवढेच नाही तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटना देशभरात, त्यांचे विद्यार्थीनीसोबतचे प्रेम संबंध याची देशभर चटकदार चर्चा झाली होती. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप लावण्यात आले होते.
- सगळं जग जणू त्यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. एका विद्यार्थीनीवर प्रेम केल्याची शिक्षा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बेदम मारहाण करुन दिल्याचीही माहिती आहे. समाजात उठता-बसता त्यांना टोमणे मारले जात होते.
- त्यांच्या पत्नीला जेव्हा त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल कळाले तेव्ही त्यांनी पोलिसात धाव घेऊन दोघांनाही तुरुंगात टाकायले लावले होते. हे प्रकरण एकेकाळी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय झाले होते.
- तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांच्या जीवनामध्ये थोडी शांतता आली. त्यांचे जीवन सामान्य झाले आणि दोघेही सध्या लिव्ह-इनमध्ये राहात आहेत.
- मटुकनाथ सध्या पाटणा विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख आहेत.

व्हेलेंटाइन डेला जूलीला गिफ्ट केली होती कार
- मटुकनाथ यांची नोकरी गेल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांना पाटणा विद्यापीठाने पाच वर्षांच्या एरियर्सचे २० लाख रुपये अदा केले होते.
- त्यांनी दुसऱ्याच दिवशी अर्थात १४ फेब्रुवारी (व्हेलेंटाइन डे) रोजी कार खरेदी करुन जूलीला गिफ्ट केली होती.
- त्यांना १६ लाख रुपये रोख मिळाले होते, ४ लाख रुपये करापोटी कापण्यात आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मटुकनाथ आणि त्यांची ३० वर्षे लहान विद्यार्थीनी व आता लिव्ह-इन पार्टनरसोबतचे फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...