आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे साधनावर लट्टू झाले होते एका मुलाचे बाप मुलायमसिंह, वाचा रंजक FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षातील यादवी काही केल्या संपताना दिसून येत नाहीये. कधी अखिलेश मुलायम यांच्यावर जड होताना दिसतो तर कधी मुलायम पोरावरच राजकीय मात करताना दिसतात. दोघांमध्ये असलेल्या संघर्षात अखिलेश यांची सावत्र आई साधना गुप्ता यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. आज आम्ही तुम्हाला समाजवादी नेते मुलायमसिंह आणि साधना यांच्यातील रिलेशनशिपची माहिती देणार आहोत.
 
असे साधनावर लट्टू झाले मुलायमसिंह
- अखिलेश यादव यांची बायोग्राफी 'बदलाव की लहर' यात वडील मुलायम यांच्या आयुष्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
- या पुस्तकात मुलायम आणि साधना यांच्या रिलेशनशिपचीही माहिती आहे.
- या पुस्तकाची लेखिका सुनीता एरोन यांच्या मते, मुलायम यांची आई मुर्ती देवी कायम आजारी राहायची.
- साधनाने लखनौ येथील नर्सिंग होम आणि नंतर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये मुर्ती देवी यांची देखभाल केली होती.
- या मेडिकल कॉलेजची नर्स मुर्ती देवी यांना चुकीचे इंजेक्शन लावणार होती.
- यावेळी साधना यांनी तिला असे करण्यापासून रोखले होते.
- साधना यांच्या समयसुचकतेमुळे मुर्ती देवी यांचे प्राण वाचले होते.
- तेव्हापासून मुलायमसिंह साधना यांच्यावर लट्टू झाले होते.
 
1994 पासून साधनाने हक्काची मागणी केली
- ऑक्टोबर 2016 सीबीआयने मुलायमसिंह यांच्या संपत्तीचा सविस्तर स्टेट्स रिपोर्ट तयार केला होता.
- यात साधना आणि मुलायम यांच्या रिलेशनचीही माहिती होती.
- साधनाने 4 जुलै 1986 रोजी चंद्र प्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले होते.
- 7 जुलै 1987 मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव प्रतिक आहे.
- 1990 मध्ये साधनाने चंद्र प्रकाश यांना घटस्फोट दिला.
- 1994 मध्ये प्रतिकने एका फॉर्ममध्ये परमनंट अॅड्रेसच्या जागी मुलायम यांच्या ऑफिशिअल रेसिडेन्सचा पत्ता लिहिला होता.
- 2000 मध्ये प्रतिकने मुलायम यांचे नाव गार्डियनच्या जागी लिहिले होते.
- मुलायम यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे निधन 2003 मध्ये झाले.
- 23 मे 2003 रोजी मुलायम यांनी साधना यांच्यासोबत गोपनिय पद्धतीने लग्न केले होते.
 
पुढील स्लाईडवर वाचा, मुलायमसिंह यांच्याशी संबंधित रंजक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...