आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकवर झाले प्रेम, आता लग्नासाठी प्रेयसीने प्रियकराच्या घरसमोर ठोकला मुक्काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद / रांची (झारखंड)- जिल्हा कृषी अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर चॅटिंग करुन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण करुन फरार झालेल्या प्रियकराला तुरुंगवारी घडविणाऱ्या प्रकरणात नवे वळण आले आहे. प्रियकर आणि प्रेयसीने आपसात तडजोड करुन त्याला तुरुंगातून बाहेर काढले. त्यानंतर तो फरार झाला आहे. त्यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार तुरुंगातून निघाल्यानंतर दोघांचे लग्न करण्याचे ठरले होते, त्यासाठी प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर मुक्काम ठोकला आहे.
नऊ एप्रिल रोजी फेसबुकच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यात मध्यप्रदेशातील सतना गावातील संगीता वर्माने बिरनी पोलिस स्टेशनमध्ये सुईयाडीह गावातील विक्रमकुमार रतन राय याने लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी विक्रमला पकडून पोलिसांनी तुरुंगात टाकले होते.
काय आहे प्रकरण
मध्यप्रदेशातील सतना गावातील अरविंद सत्यनामी यांची पत्नी संगीता वर्मा हिची विक्रमकुमारसोबत फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. या विवाहितेवर फेसबुकवर झालेल्या प्रेमाचा रंग असा चढला की 21 फेब्रुवारी रोजी दोघांनी प्रत्यक्ष भेट घेतली. तेव्हा दोघांनी एकत्र जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या आणि सोबत राहू लागले. एक दिवस विक्रमकुमार संगीताला सोडून फरार झाला. आठ एप्रिल रोजी संगिताने प्रियकर विक्रम कुमारला शोधून काढले मात्र त्याने लग्न करण्यास नकार दिला.

पुढील स्लाइडमध्ये, संगीताचा पतीसोबत घटस्फोट