आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'प्लीज मला रिजेक्ट करु नको\' म्हणत, या तरुणीवर चाकूने केले 10 वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषफदेव/उदयपूर (राजस्थान) - उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव येथील एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर भररस्त्यात चाकूने हल्ला करुन तिची हत्या केली. तो वेड्यासारखा महिलेवर चाकून वार करत होता आणि ओरडत होता की- तू माझी नाही होऊ शकत तर मी तुला दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही. अशी माहिती आहे की महिला विवाहित होती आणि आरोपी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.
एकतर्फी प्रेमाने वेडावला होता शिक्षक
- मृत महिलेचे नाव नीलम पांचाल आहे तर तिच्यावर हल्ला करणारा पीयूष भंडारी हे दोघे एकाच शाळेत शिक्षक होते.
- पीयूषचे निलमवर एकतर्फी प्रेम होते. पोलिसांनी सांगितले, की एकतर्फी प्रेमाने वेडा झालेल्या पीयुषने निलम समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तो नीलमने सपशेल नाकारला होता.
- नीलमचा नकार पीयूषच्या जिव्हारी लागला. त्याला अतिशय राग आला.
नीलमच्या नकाराने संतापला पीयूष
- गुरुवारी सकाळी नीलम शाळेच्या दिशेने निघाली असताना पीयूषने रस्त्यातच तिला अडवले.
- तो म्हणाला, 'मी तुला शेवटचे विचारतो , माझ्यासोबत लग्न करणार का?'
- भररस्त्यावर अडवून अशा पद्धतीने विचारणा झाल्याने नीलम घाबरली, मात्र तिने आजपर्यंत देत आलेले उत्तर पुन्हा एकदा दिले. तिने लग्नाला नकार दिला.
- त्याच क्षणी पीयूषने सोबत आणलेला चाकू काढला आणि सपासप नीलमच्या शरीरावर वार करु लागला.
- पहिला वार त्याने गळ्यावर केला, मग शरीराचा कोणताही भाग त्याने सोडला नाही. जवळपास त्याने 10 वार केले.
पुढील स्लाइडमध्ये, चाकूने वार करताना म्हणत होता, प्लीज मला रिजेक्ट करु नको