आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराने तिचे व तीन मुलांचे शिर नेले कापून, बिहारच्या बेगुसरायमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेगुसराय - वय ३०, दोन विवाह. पहिला पती दररोज मारहाण करत असे. आता दुसरा पती तिची आणि तिच्या तिन्ही मुलांची हत्या करून फरार झाला आहे. ही घटना आहे बेगुसरायची. १८ सप्टेंबरला तीन मुले आणि एक महिला यांचे शिरविहीन मृतदेह आढळले. हे मृतदेह पूजा आणि तिच्या तीन मुलांचे असल्याचे उघडकीस आले.

ज्याच्यावरील प्रेमासाठी पूजाने आपल्या पहिल्या पतीला सोडले होते त्या सर्वेशवरच हत्येचा संशय आहे. बिहारच्या कटिहारमध्ये पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या पूजा गुप्ताचे लग्न झालेले होते, तरीही ती सर्वेश शर्मा या युवकावर प्रेम करत होती. सर्वेशचे लग्न झाले होते, पण २००६ मध्ये दोघांनी कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात लग्न केले. पूजाला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता. मुलाला पतीजवळ सोडून ती सर्वेशकडे आली होती. २०१० मध्ये सर्वेशने पूजाच्या माहेरच्या जमिनीवर घर बनवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या भावांनी दोघांना घरातून हाकलले. त्यानंतर दोघे राजस्थानमधील बिकानेरमध्ये पूजाची मोठी बहीण अंजूच्या घरासमोर राहू लागले.
सर्वेश काहीही काम करत नसे. सर्वेश आणि पूजाला तीन अपत्ये झाली. त्यांच्यासमोर सर्वेश तिला मारहाण करत असे. सर्वेशला सोडून दे असे अंजूने अनेकदा पूजाला सांगितलेही, पण तिला ते मान्य नव्हते. नंतर विविध ठिकाणी राहून ते बेगुसरायच्या बाघा मोहल्ल्यात राहू लागले. तेथेच पूजा आणि तीन मुलांचे मृतदेह सनहा रेल्वे थांब्याजवळ झुडपांत मिळाले. सर्वेश अजूनही फरारच आहे. हे एकट्या सर्वेशचे काम नाही, असे पोलिसांना वाटते. त्या दिशेने तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...