आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी बनून चॅट करणारे निघाले पती-पत्नी, प्रेमविवाहानंतर दोघांत पटत नव्हते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - प्रेम विवाहानंतरही दोघांचे पटत नव्हते. नात्यांतील या अस्वस्थतेमुळे आणि प्रेमाच्या शोधात सोशल साइटवर सुरू झाला चॅटिंग आणि चीटिंग यांचा सिलसिला. फेसबुकवर छायाचित्र न टाकता, नाव बदलून दोघे प्रेमाच्या शोधात होते की टाइमपास करत होते हे ते दोघेच जाणोत, पण नशीब असे की नकळत पत्नीने पतीलाच बॉयफ्रेंड म्हणून व पतीने पत्नीला प्रेमिका म्हणून निवडले. जेव्हा हे प्रियकर-प्रेयसी एकमेकांना भेटण्यासाठी सोमवारी शांतीकुंज येथे पोहोचले आणि तेथे हा भंडाफोड झाला. पती सरकारी नोकरीत आहे, तर पत्नी एका आयटी फर्ममध्ये मोठ्या पदावर आहे. ऑनलाइन मैत्री आणि चॅटिंगमुळे निर्माण झालेला प्रकार शांतीकुंज पार्कमध्ये सर्वांनी पाहिला. पोलिसही तेथे आले. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर दोघांत मारहाणीची वेळ आली. पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांना समजावून परत पाठवले.

या पती-पत्नीत सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. एका आलिशान सोसायटीत राहणाऱ्या या महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती. त्यानंतर दोघे वेगवेगळे राहत होते. नंतर दोघांनी फेसबुकवर फेक आयडी बनवला आणि दोघेही प्रेमाच्या शोधात निघाले. योगायोग म्हणा की विरोधाभास, दोघांनीही एकमेकांची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली आणि चॅटिंगचा सिलसिला सुरू झाला. १४ मे रोजी शांतिकुंजमध्ये भेटायचे ठरले, पण ते जमले नाही. कारण त्याच दिवशी महिला कक्षाने काउन्सिलिंगसाठी बोलावले होते. दोघांना समजावून सांगून परस्परांसोबत राहण्यासाठी पाठवले. दोघे सोबत राहू लागले. त्यामुळे काही दिवस फेक आयडीने चॅटिंगही बंद होती. गेल्या बुधवारी पुन्हा भांडण झाले आणि त्याच दिवशी दोघांचे चॅटिंग सुरू होऊन प्रेमाचा शोध सुरू झाला. सोमवारी दोघांनी शांतिकुंजमध्ये भेटायचे ठरवले. दुपारी १२ वाजता दोघेही पोहोचले. कोणता ड्रेस घालून येणार हे फेसबुकवर सांगितलेले होतेच. तेथे भेटताच दोघेही हबकले. भांडण सुरू झाले. बघेही गोळा झाले. त्यानंतर सुरू झाले वस्तुस्थितीवर पडदा टाकण्याचे काम. मला खरी माहिती होती, पकडण्यासाठी जाळे लावले होते, असे आरोप-प्रत्यारोप झाले. पोलिसांनी अखेर दोघांना समजावून सांगून परत पाठवले.
बातम्या आणखी आहेत...