(फोटो ओळ- रिना मालगतीचा दोन मुले आणि नवऱ्यासोबतचा फोटो.)
बेळगाव- विवाहबाह्य संबंधांना नकार दिल्याने चिडलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांची प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी प्रविण भट्ट (वय 23) याला अटक केली आहे. त्याने रिना मालगती (वय 37), तिचा मुलगा आदित्य (वय 12) आणि साहित्या (वय 5) यांची हत्या केली.
रिनाचे प्रविणवर होते प्रेम
सीए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेला प्रविण रिनाच्या घराशेजारी राहायचा. गेल्या वर्षभरापासून प्रविणसोबत रिनाचे संबंध होते. पती दुसऱ्या गावी गेला, की रिना फोन करुन प्रविणला घरी बोलावून घेत होती. मात्र प्रविणने आता अनैतिक संबंधांना नकार दिला होता. त्याला हे संबंध संपवायचे होते. पण रिनाने याला नकार दिला होता. त्यातून हे हत्याकांड घडले.
असे घडले हत्याकांड
रिनाचा पती राकेश मालगती याचा कापडाचा व्यवसाय आहे. त्याचा भाऊ काही दिवसांपूर्वी विदेशातून आला होता. त्यानंतर तो आणि भाऊ गोव्याला फिरायला गेले होते. पती घरी नसल्याने रिनाने मध्यरात्री प्रविणला फोन केला. त्याला घरी बोलावले. दोघांमध्ये टेरेसवर चर्चा झाली. त्यानंतर प्रविण घरी निघून गेला. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिनाने पुन्हा प्रविणला फोन केला.
प्रविण रिनाच्या घरी आला. आता आपण हे संबंध संपवुयात असे त्याने सांगितले. रिनाने याला नकार दिला. रिना आणि प्रविणचे कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या प्रविणने रिनाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. मोठा रक्तस्त्राव झाल्याने रिनाचा जागीच मृत्यू झाला.
मुलांचा गेला बळी
भांडणाचा आवाज आल्यावर रिनाच्या शेजारी झोपलेले आदित्य आणि साहित्या जागे झाले. प्रविणने साहित्याला बाथरुममध्ये नेवून पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले. आदित्यचा गळा दोरीने आवळला.
सुदैवाने भाचा वाचला
घटनेच्या रात्री रिनाचा 16 वर्षांचा भाचा हर्ष रेडेकर घरी आला होता. पण फुटबॉल खेळून दमल्याने शेजारच्या खोलीत रात्री लवकर झोपला होता. त्याच्या खोलीला बाहेरुन कडी लावण्यात आली होती. सकाळी जाग आल्यावर हर्षने रिनाच्या पतीला मेसज करुन माहिती दिली. त्यानंतर त्याने बेळगावातील मेहुण्याला घरी पाठविले. तेव्हा हे हत्याकांड उघडकीस आले.
असे पकडले प्रविणला
रिनाचा मोबाईल गायब होता. तिने शेवटचा कॉल कुणाला केला होता, याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर प्रविणला अटक केली. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला.
पुढील स्लाईडवर बघा, प्रविण हिंडलगा याचा फोटो....