आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या, डोके ट्रॅकवर तर धड दुसरीकडे पडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटिंडा : पंजाबमध्ये मंगळवारी एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ट्रॅकवरील मृत्यूचे हे तांडव पाहण्यासाठी लोकांनी भरपूर गर्दी केली होती. मुलाचे डोके ट्रॅकवर तर धड दुसरीकडे वेगळे होऊन पडले होते.

मुलीने आई-मावशीवर लावला आरोप
- ही हृदयद्रावक घटना भटिंडाच्या गिद्धडबाहा शहराजवळ घडली. घटनेच्या ठिकाणी मिळालेल्या सुसाईड नोटनुसार मुलगा-मुलगी दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते.
- दोघांचेही प्रेम मुलीच्या घरच्यांना पसंत नव्हते. परंतु काही काळाने दोन्ही कुटुंबानी दोघांचे प्रेम मान्य केले होते, तरीही हे दोघे घरातून पळून गेले होते.
- मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट न पटल्यामुळे त्यांनी मुलाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
- पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली. यामध्ये मुलीने आत्महत्येचा आरोप आपल्या आई आणि मावशीवर लावला आहे.

मुलाची ओळख पटली
- मुलाची ओळख जसविंदर सिंह रूपात झाली आहे, परंतु अजूनही मुलीची ओळख पटलेली नाही.
- घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही शव ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, या घटनेचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...