आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Low Intencity Blast In Imphal Read More At Divya Marathi

कमी तीव्रतेच्या साखळी स्फोटांनी हादरले इंफाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंफाळ - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इंफ़ाळ शहर साखळी स्फोटांनी हादरले आहे. घडवून आणलेले हे तिनही स्फोट कमी तीव्रतेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नसून स्फोटांसाठी नेमके कोणते पदार्थ वापरण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अद्याप या घटनेची जबाबदारी कोणत्याच संघटनेने घेतलेली नसून पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रजासत्ताक दिनासाठी संपूर्ण भारतात कडेकोट बंदोबस्त असताना देखील हा स्फोट घडवून आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.