आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेहमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/ जयपूर/ सिमला - जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये या वर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये माउंट अबूमध्ये पारा 6.4 अंश सेल्सियपर्यंत घसरला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये थंडीची लाट आली.
लेहमध्ये उणे 11.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी हे तापमान उणे 10.7 अंश सेल्सियस होते. राजस्थानच्या चुरूमध्ये किमान 7.5 अंश सेल्सियस तापमान आहे.
राजस्थानच्या बहुतांश भागात हुडहुडी भरली आहे.हिमाचल प्रदेशातही थंडीची लाट आली आहे. रावी, बियास आणि सतलज नदी किना-यालगतच्या शहरांवर दाट धुक्याची चादर पसरली आहे. मनाली आणि भुंतर या पर्यटन स्थळांचे तापमान उणे 1.4 अंश सेल्सियस होते.