आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर ले.कर्नलची आत्महत्या, प्रेयसीचा गळाही दाबला, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरा - याठिकाणी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या लिटनंट कर्नलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. टी जाधव असे त्यांचे नाव असून ते महाराष्ट्राचे होते. विषारी इंजेक्शनचा वापर करून त्यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या ज्युनियर महिला ऑफिसरचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेबरोबर त्यांचे अफेयर होते, असे पोलिसांनी सांगितले.

ले.कर्नल जाधव (४०) हे अॅनास्थेटिस्ट म्हणून मथुरा येथील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांपासून जाधव याठिकाणी रुजू होते. शुक्रवारी जाधव हे बालदेव रोडजवळ त्यांच्या एका ज्युनिअर असिस्टंट बरोबर लाँग ड्राइव्हसाठी गेले होते. नर्सिंग असिस्टंट असलेली ही महिला त्यावेळी त्यांच्याबरोबरच होती. याचवेळी जाधव यांनी आधी तिचा गळादाबण्याचा प्रयत्न केला आणि नंतर आत्महत्या केली.

या घटनेशी संबंधित घटनाक्रम जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...