आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर दहशतवाद्यांचा अंदाधूंद गोळीबार, एक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मिरच्या श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर शनिवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सांबा येथील लष्कराची छावणी आणि हिरानगर पोलिसस्टेशनला लक्ष्य करण्यात आले होते. महामार्गावरील गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला आहे. पोलिसांनी हल्ल्याला दुजोरा दिला असून अतिरेक्यांशी पोलिस आणि लष्कराची चकमक सुरू असल्याचे सांगितले आहे.

(जम्मू दहशतवादी हल्ल्याची "आंखो देखी")

अतिरेक्यांनी हैदपुरा येथे हल्ला केला असून तिथे पोलिस आणि लष्कराच्या जवानांची अतिरेक्यांशी चकमक सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर शनिवारी सकाळी दोन अतिरेकी बाईकवर आले आणि लष्कराच्या वाहनांवर अंदाधूंद गोळीबार सुरू केला. त्यांना लष्कर आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीच्या आधी तीन दिवसात अतिरेक्यांनी हा तिसरा हल्ला केला आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी 'शोहादा ब्रिगेड' या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी 6.45 वाजता प्रथम कठुआ येथील हिरानगर पोलिस स्टेशनला लक्ष्य केले. त्यानंतर एका तासाने दहशतवादी सांबा येथील लष्कराच्या छावणीत घुसले. या दुहेरी हल्ल्यात 10 जण ठार झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातला.

गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरच्या विविध भागांमध्ये गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी शुक्रवारी सायंकाळी राजौरी सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले आहे. फायरिंगच्या आडून घुसखोरी करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत थोड्या थोड्या वेळाने फायरिंगचा आवाज सुरूच होता.

पुढील स्लाइडमध्ये, असा झाला होता दुहेरी हल्ला...