आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस-वेचे उदघाटन, 8 फायटर प्लेनचे झाले लँडिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री अखिलेश यादव. - Divya Marathi
समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री अखिलेश यादव.
लखनऊ - आगरा-लखनऊ 6 लेन ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वेच्या उदघाटनप्रसंगी यादव कुटुंब एकत्र दिसले. त्यासोबतच एक्स्प्रेस-वेवर जेट विमान उतरवले गेले. 302 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस-वेचे उद्घाटन समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव मुख्यमंत्री अखिलेश यादव, राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव, कॅबिनेट मंत्री आजम खान मंचावर उपस्थित होते. मंगळवारी मुलायमसिंहाचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री अखिलेश यांनी पित्याला एक्स्प्रेस-वेची भेट दिल्याचे राजकीय वर्तळूता बोलले जाते आहे. उद्घाटनानंतर एअरफोर्सच्या फायटर प्लेनने या मार्गावरुन उड्डाण केले. एक्स्प्रेस-वेलसा एअर स्ट्रिपसाठीही उपयोगात आणता येईल अशा दर्जाचे तयार करण्यात आले आहे. आपातकालिन स्थितीमध्ये या मार्गावर विमान लँड आणि टेक ऑफ करु शकणार आहेत.
- उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते म्हणाले, 'एक्स्प्रेस-वेचा मुख्य कॅरिज-वे अवघ्या 23 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला आहे.'
- या मार्गाचे वैशिष्ट्य असे आहे की 10 जिल्ह्यांमधून 232 गावातील जवळपास 3500 हेक्टर जमीन 30 हजार 4456 शेतकाऱ्यांकडून कोणताही वाद न होता खरेदी करण्यात आली.
- एक्सप्रेस-वे आगरा ते फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, औरैया, कन्नौज, हरदोई, कानपुर नगर आणि उन्नाव मार्गे लखनऊ पर्यंत पोहोचतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उन्नाव येथील कार्यक्रमात कोण-कोण सहभागी झाले... अखेरच्या स्लाईडवर बघा VIDEO....
बातम्या आणखी आहेत...