आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lucknow Barauni Krishak Express Collide Train Accident Gorakhpur Latest News

PHOTOS: UP रेल्वे दुर्घटना: डबे कापून काढले छिन्न-विछिन्न मृतदेह, चालकाची चुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे मंगळवारी रात्री लखनऊ-बैरोनी आणि कृषक एक्स्प्रेस या दोन रेल्वेंमध्ये टक्कर झाली यात 13 जणांना प्राण गमवावे लागले तर, 50 हून अधिक लोक जखमी आहेत. बुधवारी सकाळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. दोन्ही रेल्वेंमध्ये झालेली धडक एवढी जबरदस्त होती, की मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी बोगी कापावी लागली. या दुर्घटनेत काहींच्या शरीरापासून त्यांचे पाय वेगळे झालेले होते, तर काहींचा हात. काही मृतदेह अतिशय विदारक स्थितीत अढळून आले आहेत. रेल्वे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, की कृषक एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात झाला. त्याला तत्काळ निलंबीत करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात
गोरखपूरच्या नंदानगर येथे मंगळवारी रात्री साधारण 11 वाजता ही दुर्घटना घडली. लखनऊहून येणारी बरौनी एक्स्प्रेस रेल्वे फाटक पार करत असताना शेजारच्या ट्रॅकवरुन लखनऊकडे कृषक एक्स्प्रेस जात होती. अचानक कृषक एक्स्प्रेसचे इंजिन बरौनी एक्स्प्रेसच्या मधल्या डब्यांना जाऊन भिडले. ही टक्कर जोरदार होती, यामुळे बरौनी एक्स्प्रेसचे तीन डबे (7,8 आणि 9) उलटले तर, त्यांच्या शेजारचे डबे रुळांवरुन खाली उतरले.
डबे कापून काढले मृतदेह
दोन्ही रेल्वेंची झालेली टक्कर एवढी जबरदस्त होती की, बरौनी एक्स्प्रसेचे तीन डबे (स्लिपर कोच) उलटले. बचाव कार्यादरम्यान मृतदेह काढण्यासाठी डब्यांना कापण्यात आले. यात काहींच्या शरीरापासून हात आणि पाय वेगळे झाले. मांसाचे तुकडे इतस्था विखूरले गेले.
जखमींना तत्काळ मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अँम्ब्यूलन्सने जखमींना हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि रेल्वेचे अधिकारी मदतकार्य करत आहेत. अपघाताचे कारण साइट कोलिजन असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत दोन्ही एक्स्प्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.
मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर
उत्तर-पूर्व रेल्वेने बरौनी आणि कृषक एक्स्प्रेस दुर्घटनेत जखमींना 5 हजार रुपये, गंभीर जखमींना 25 हजार रुपये आणि या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. उत्तर-पूर्व रेल्वेचे सीपीआरओ अलोक सिंह यांनी यांची माहिती दिली. ते म्हणाले, या दुर्घटनेसाठी कृषक एक्स्प्रेसचा लोको पायलट रामबहादूर आणि सहायक लोको पायलट सत्यजीत यांना निलंबीत करण्यात आले आहे. तिकीटांची रक्कम रिफंड करण्यासाठी गोरखपूर रेल्वेस्टेशन येथे विशेष काउंटर सुरु करण्यात आले आहे.
अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त रेल्वेचे डबे पटरीवरून हटवण्याचे काम सुरु होते. रात्रीच रेल्वेट्रॅकवरुन डबे हटवून ट्रॅक मोकळा करण्यात आला. लवकरच त्यावर पुन्हा ये-जा सुरू होऊ शकते. या अपघातामुळे जवळपास एक डझन रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील बचावकार्याचा व्हिडिओ