आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मथुरा रॅलीत पंतप्रधानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांना मेसेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेशातील मथुरा येथे 25 मे रोजी होणार्‍या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. मथुराचे एसएसपी डॉ. राकेश कुमार यांच्या मोबाइलवर आज (शनिवारी) धमकीचा मेसेज मिळाला. त्याचप्रमाणे धमकीचे एक पत्र वरिष्ठ पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मथुरा येथील रॅलीत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे जिल्हा प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.

केंद्रात सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मथुरेतील दिनदयाल धाम येथे 25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका रॅलीत संबोधित करणार आहेत. धमकीचा मेसेज आणि पत्रानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

धमकीचे पत्र आणि मेसेजची चौकशी सुरू केली आहे, मेसेज करणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आल्याचे मथुरेच्या गुन्हा शाखेचे एसपी अशोक कुमार यांनी सांगीतले आहे.