आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lucknow Congress Office Ransacked By Bundelkhand Vikas Sena News In Marathi

काँग्रेस कार्यालयात हाणामारी; 7 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - बुंदेलखंड अधिकार सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला. त्यांनी कार्यालयात पदाधिकार्‍यांना मारहाण करून तोडफोड केली. या घटनेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते द्विजेंद्र त्रिपाठींसह सात जण जखमी झाली. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेस कार्यकर्त्यांनीही काही महिलांना लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केली. कार्यालयात धुडगूस घालणार्‍या या महिला बुंदेलखंड विकास सेनेच्या असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. बुंदेलखंड अधिकार सेनेचे बॅनर व झेंडे घेऊन लोकांचा जमाव अचानक प्रदेश कार्यालयात घुसला. नारेबाजी करत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यांनी अनेकांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत पक्षाचे प्रवक्ते त्रिपाठी हे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह पक्षाचे सात जण जखमी झाले. हल्लेखोरांनी मुख्यालय परिसरात उभ्या असलेल्या कारसह इतर वाहनांची तसेच खोल्यांचे दरवाजे तोडून खुच्र्यांची मोडतोड केली.

काँग्रेसचा भाजपवरही आरोप
काँग्रेस सूत्रांनी या हल्ला प्रकरणात या हल्ल्यात भाजपचेही काही लोक सामील होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र बुंदेलखंड राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा या संतप्त कार्यकर्त्यांचा आरोप होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही हल्लेखोरांना पकडले आहे.