आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेश विधानसभेत सापडलेले पावडर होते सिलिकॉन ऑक्साइड, FSL संचालक निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेत 12 जुलैला सापडलेले संशयास्पद पावडर घातक स्फोटक PETN असल्याचे सांगणाऱ्या फॉरेन्सिक लॅब (FSL) डायरेक्टर एस.बी. उपाध्याय यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रयोगशाळेने अहवाल दिला होता की सापडलेले पावडर हे घातक स्फोटक PETN आहे. त्यानंतर हैदराबाद येथील केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅब येथे त्याची तपासणी करण्यात आली त्यात ते पावडर सिलिकॉन ऑक्साइड असल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे ते स्फोटक नव्हते. 
 
एक्सपायरी किटने केली होती तपासणी 
- तपासात समोर आले की लखनऊ येथील प्रयोगशाळेत मार्च 2016 मध्ये एक्सापायर झालेल्या किटने संशयास्पद पावडरची तपासणी करण्यात आली होती. 
- लखनऊ प्रयोगशाळेच्या अहवालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत संशयास्पद स्फोटके सापडल्याचे सांगितले होते. 
- संशयास्पद पावडर स्फोटके असल्याचा अहवाल आल्यानंतर तपसाणीसाठी वापरण्यात आलेल्या किटबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले होते. जेव्हा किटची तपासणी केली तेव्हा किट एक्सापायर झाल्याचे समोर आले होते. 
 
काय आहे सिलिकॉन ऑक्साइड 
- सिलिकॉन ऑक्साइट हे घातक नाही. अनेक फुड प्रॉडक्टमध्ये याचा वापर होतो. याला सिलिकाच्या नावाने ओळखले जाते. याला अँटीकेकिंग एलिमेंटही म्हटले जाते. 
 
12 जुलैला यूपी विधानसभेत सापडले होते पावडर 
- 12 जुलै रोजी उत्तर प्रदेश विधानसभेत 150 ग्रॅम संशयास्पद पावडर सापडले होते. फॉरेन्सिक तपासणीनंतर ते स्फोटक असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. 
- हे पावडर समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे यांच्या सीटखाली सापडले होते. 
- विधानसभेत पावडर सापडल्यानंतर सीएम योगींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. 
- विशेष म्हणजे विधानसभेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्येही हे पावडर आत केस आले याची माहिती मिळाली नव्हती.
बातम्या आणखी आहेत...