आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lucknow Gauri Murder Case Disclose Boyfriend Killed Arrested

PHOTO गौरी हत्याकांड: सुरुवातीला गळा दाबून केली हत्या, नंतर करवतीने केले तुकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - लखनऊ पोलिसांना रविवारी गौरी मर्डर केसमध्ये महत्त्वाचे यश मिळाले आहे. गौरीच्या हत्येनंतर तिचा प्रियकर हिमांशूनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. हिमांशूला गौरीचे इतर लोकांशी अवैध संबंध असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने पहिले गौरीची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर हिमांशूने गौरीच्या शरीराचे करवतीने तुकडे तुकडे केले. पोलिसांनी या प्रकरणी हिमांशू आणि त्याचा मित्र अनुजला अटक केली आहे. 
 
पोलिसांना या २ फेब्रूवारीला लखनऊमध्ये गौरीचे मृतशरीर एका पोत्यात बंद असलेले आढळले. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घटनेत वापरण्यात आलेली दुचाकी, करवत आणि आरोपीचे जॅकेट इत्यादी सामान दाखवले आहे. डीजीपी ए. के. जैन यानी सांगितले की, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करणार असून या प्रकरणी रासुका अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. 

गौरीला दीड वर्षांपासून ओळखत होता हिमांशू
डीजीपी ए. के. सिंगनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू गौरीला जवळपास दीड वर्षांपासून ओळखत होता. एक फेब्रूवारीला 6.58 मिनिटांनी गौरीचे हिमांशूसोबत बोलणे झाले होते. हिमांशूने गौरीला लाटूश रोडवर असलेल्या पीयर्स इंटरनॅशनल हॉटेल येथे भेटण्यास बोलावले. तेथून हे दोघे बाईकवर तेलीबाग येथे असलेल्या हिमांशूच्या घरी गेले. हिमांशूच्या घरचे सर्व लोक यावेळी लग्नासाठी बाहेर केले होते. 

गौरीच्या मोबाईलमध्ये आपत्तीजनक फोटो पाहून भडकला हिमांशू 
घरी पोहोचल्यावर हिमांशूने गौरीचा मोबाईल पाहाण्यासाठी मागितला. मात्र गौरीने तो देण्यास नकार दिला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हिमांशूने गौरीकडून मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमध्ये गौरीचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ पाहून हिमांशू भडकला. या दरम्यान गौरीने त्याला सांगितले की, माझे इतर दोन तरूणांशी संबंध आहेत. तेव्हा हे ऐकताच हिमांशूने रागाच्या भरात गौरीची गळा दाबून हत्या केली. 

गौरीच्या मृतदेहाचे केले तुकडे तुकडे 
गौरीच्या हत्येनंतर हिमांशू बाजारात गेला. तेथे त्याने भरपूर दारू पिली आणि तेथून करवत आणि पॉलिथिन बॅग विकत घेतली. यानंतर त्याने घरी येऊन करवतीने गौरीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. हे करताना गौरीच्या शरीरातील रक्त बाहेर जाऊ नये यासाठी त्याने गौरीचे कपडे घरातून निघणाऱ्या नालीमध्ये दाबून टाकले. यानंतर रक्ताने भरलेले कपडे आणि मृतदेहाचे तुकडे बॅगमध्ये भरून तीन-चार फेऱ्यांमध्ये त्याने ते फेकून दिले. तपासादरम्यान पोलिसांनी गौरीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले, तेव्हा आरोपीच्या घराजवळच 50 मीटरच्या आसपासच्या परिसरात ते दाखवण्यात आले. मात्र 20 मिनिटातच ते बंद झाले. 

हिमांशूच्या घरासमोर मिळाली सीसीटीव्हीमध्ये दिसलेली बाईक 
गौरीच्या मोबाईलचे लोकेशन कळाल्यानंतर पोलिसांनी काही घरांमध्ये चौकशी केली. या दरम्यान एका घरासमोर अगदी सीसीटीव्ही फुटेजप्रमाणेच बाईक दिसून आली. या बाईकवर गणपतीचा लोगो पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जेव्हा या बाईकच्या मालकाचा दरवाजा वाजवला. तेव्हा त्या घरातून एक तरूण बाहेर आला. या तरूणाच्या शरीराची बनावट सीसीटीव्ही फुटेजमधील मुलाप्रमाणेच होती. एवढेच नाही तर तो तरूण मोबाईलवर मोहनलालगंज हत्याकांडाचे फोटो पाहात होता. 

आरोपीच्या घरी मिळाला गौरीचा मोबाईल 
यानंतर पोलिसांनी हिमांशूच्या घराची झडती घेतली तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले जॅकेट, बुट आणि जिन्सही आढळून आली. तसेच त्याच्या मोबाईलवर गौरीचा फोटोही लावलेला आढळून आला. शिवाय घरात गौरीचा मोबाईलही आढळून आला. सुरूवातीला हिमांशूने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक तपास केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. हिमांशूचे वडील रेल्वेमध्ये चतूर्थ श्रेणीतील कर्मचारी आहेत. 

पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे सविस्तर फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर या घटनेचा व्हीडीओसुध्दा...