आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lucknow Girl Dead Body Found In Pieces Doubt On Love Triangle News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमाच्या त्रिकोणात अडकली होती गौरी?, सोशल मीडियाने उलगडले रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गौरीची 'फेसबुक'वरील प्रोफाइल इमेज)
लखनौ- अमिनाबादमध्ये 17 वर्षीय गौरीची हत्या प्रेमसंबंधातून झाल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. गौरी प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याची माहिती सोशल मीडियातून उजागर झाली आहे. गौरीचा मृतदेह मंगळवारी येथील वृंदावन कॉलनीत सापडला होता. तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून एका पोत्यात भरण्यात आले होते.

पोलिसांनी प्रथमदर्शनी हत्येपूर्वी गौरीवर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवली होती. गौरीविषयी आमच्या प्रतिनिधीने तिचे मित्र आणि पोलिसांशी संपर्क साधला असता, याप्रकरणातील 'प्रेमाचा त्रिकोण' समोर आला आहे.
गौरी वॉट्‍सअॅप आणि फेसबुकवर रात्री उशीरापर्यंत चॅटींग करत असल्याची माहिती मिळाली आहे. तिला खूप मित्र-मैत्रिणी होते. काही तरुणांनी गौरीला मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. तो तिने स्विकारला होता.
मोठे फ्रेंड सर्किल...
गौरीची हत्या झालेल्याची माहिती मिळताच त्याच्या घरी आणि रुग्णालयातील पोस्टमार्टम रुमच्या बाहेर तिचे अनेक मि‍त्र उपस्थित होते. यावरून गौरीचे फ्रेंड सर्किल मोठे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गौरीच्या हत्येमागे तिच्या जवळच्या मित्रांचा हात असावा, असा संशय गौरीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. गौरीचे शिशिर श्रीवास्तव यांनी सांगितले की, तासंतास 'वॉट्सअॅप'वर असायची कोणासोबत चॅटिंग करायचे हे माहीत नाही.

पोलिसांचे मौन...
गौरीच्या हत्येविषयी पोलिस तपास करीत आहे. मात्र, अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पाचपैकी आदित्य आणि एहसान या दोघांवर पोलिसांना संशय आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, रात्री उशीरापर्यंत गौरी करायची मित्रांसोबत चॅटिंग...
आदित्य आणि एहसान हे दोघे मित्र आहे. आदित्य आणि गौरीची चांगली मैत्री होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. नंतर गौरीने एहसानसोबत मैत्री केली होती. गौरीच्या हत्येमागील हे प्रमुख कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.