आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी बंद पडली लखनऊ मेट्रो; सर्व्हर बंद पडल्याने रेल्वेसेवा दोन तास ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ  - चार वर्षांत तयार करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रो रेल्वेची सेवा बुधवारी म्हणजे पहिल्याच दिवशी विस्कळीत झाली. मेट्रो २ तास बंद होती. याचा फटका प्रवाशांना बसला. मेट्रो व्यवस्थापनाने यासंबंधी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, ट्रॅक्शन मोटारमध्ये बिघाड झाल्याने आपत्कालीन संदेश घेता आले नाहीत. ती दुरुस्त करण्यास बरेच प्रयत्न झाले. यंत्रणा दुरुस्त न झाल्याने लोकांना आपत्कालीन प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. या मेट्रोमध्ये १०१ प्रवासी होते. सर्व प्रवाशांना ४० मीटरचे अंतर पायपीट करत स्थानक गाठावे लागले. 
 
सोशल मीडियावर याची खिल्ली उडवण्यात आली. एका युजरने लिहिले, प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. या मेट्रोचे दरवाजे उजव्या किंवा डाव्या बाजूने नव्हे, तर समोरून उघडले जातात. एकाने लिहिले, कोणीतरी पान खाऊन मेट्रो नियंत्रण यंत्रणेवर थुंकल्यामुळे यंत्रणा बिघडली. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टि्वट केले: “लखनऊ मेट्रोची आधीच सिद्धता झाली होती. 

केंद्र सरकारने “एनओसी’देण्यात खूप काळ लावला. तरीही पहिल्याच दिवशी मेट्रो ठप्प झाली.’ लखनऊच्या अमोसी विमानतळावरून दिल्लीच्या गौरव त्रिपाठी यांना विमानाने जायचे होते. गौरव सकाळी ६.१० वाजता मेट्रोने िनघाले. ६ वाजून ३८ मिनिटांनी तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तास रेल्वे थांबली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत ती दुरुस्त न झाल्याने आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडावे लागले. विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांचे विमान सुटले. या ढिसाळ कारभाराबद्दल मेट्रो व्यवस्थापनाने केवळ “सॉरी’ इतकाच शब्द उच्चारला.  
गौरव यांचे म्हणणे असे की, मला कायदेशीर सल्ला मिळाल्यास मी तिकिटाचे पैसे परत मिळवण्याचा दावा करणार आहे.  

सर्व्हर बंद झाले, एमडी म्हणाले : समस्या सोडवू  : लखनऊ मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अमित श्रीवास्तव यांनी सांगितले, मवैया आणि दुर्गापुरीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे थांबली. त्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. कोणत्याही प्रकारची अव्यवस्था झाली नाही. ४० मिनिटांत ऑपरेशन पार पडले. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे सर्व्हर ठप्प झाले होते. अनेक प्रवाशांचे टोकन आणि गो-स्मार्ट कार्ड अचानक अवैध ठरले. यासंदर्भात बोलताना मेट्रोचे कार्यकारी संचालक कुमार केशव यांनी सांगितले, सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे तक्रारी आल्या. काही लोकांचे कार्ड आणि टोकन अवैध ठरले.  ही समस्या दूर केली जाईल. 

सपा कार्यकर्त्यांवर लाठीमार  
यादरम्यान ट्रान्सपोर्टनगर स्थानकावर िनदर्शने करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर बेछूट लाठीमार करण्यात आला. मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याचे श्रेय अखिलेश यादव यांना देण्यावरून कार्यकर्त्यंाची निदर्शने चालू होती. गोंधळ वाढत गेल्याने ट्रान्सपोर्टनगर मेट्रो रेल्वेस्थानक बंद करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...